AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav | मी खूप काळापासून विराटच्या नेतृत्वात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो : सूर्यकुमार यादव

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध ही सीरिज खेळणार आहे.

Suryakumar Yadav | मी खूप काळापासून विराटच्या नेतृत्वात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो : सूर्यकुमार यादव
इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध ही सीरिज खेळणार आहे.
| Updated on: Feb 27, 2021 | 2:12 PM
Share

मुंबई : “मी आयपीएलमध्ये (IPL) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध खेळलोय. विराटमध्ये नेहमीच पॉझिटिव्ह अॅटीट्युड दिसून येतो. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हवं ते मिळवलं आहे. तो मैदानावर नेहमीच उत्साही असतो. विराटमध्ये विजयाची भूक आहे. विराट कोहलीचा माझ्यावर फार प्रभाव आहे”, असं मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला. तो एका मुलाखतीत बोलत होता.(suryakumar yadav on virat kohli)

सूर्यकुमार काय म्हणाला?

“मला विराटबरोबर कधी ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली नाही. पण मी माझ्या मुंबई इंडियन्सचा सहकारी मित्र हार्दिक पांड्याला तो कसा सराव करतो याबद्दल विचारत असतो. तसंच विराट नेमकं असं काय करतो की ज्यामुळे तो मैदानात इतरांपेक्षा वेगळा जाणवतो, याबाबतही मी पांड्याला अनेकदा विचारलं आहे”, असं सूर्यकुमारने नमूद केलं. तसेच सूर्याने यावेळेस विराटच्या नेतृत्वा बाबत प्रतिक्रिया दिली.

विराटच्या नेतृत्वाबाबत सूर्यकुमार काय म्हणाला?

“मी खूप काळापासून विराटच्या नेतृत्वात खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. आणि आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. मला विराटकडून बरंच काही शिकायचंय. मी विराटकडून आणखी शिकून आणखी चांगला खेळाडू बनण्यासाठी उत्सुक आहे”, असंही सुर्याने म्हटलं.

आयपीएलच्या 13 व्या मोसमात एका सामन्यादरम्यान विराट आणि सूर्यकुमार दोघे आमनेसामने आले होते. या मॅचमध्ये विराटने सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून विराट आणि सूर्यकुमार दोघेही चर्चेत राहिले आहेत.

नक्की काय झालं होतं?

मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात 28 ऑक्टोबर 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 48 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते.

विजयी आव्हानाचं पाठलाग करताना सूर्यकुमार चांगला खेळत होता. विकेट मिळत नसल्याने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हतबल झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे विराटने सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार 13 व्या षटकादरम्यान घडला. विराट स्ट्राईक एंडला असलेल्या सूर्यकुमारच्या दिशेने गेला. त्याला काहीही न बोलता ठस्सण देण्याचा प्रयत्न विराटने केला. मात्र सूर्यकुमारने विराटला प्रत्युत्तर न देता शांत राहिला, आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशने निघून गेला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता . त्यामुळे विराटला नेटीझन्सनी चांगलेच फैलावर घेतले होते.

या सामन्यात सूर्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 सिक्सरसह 79 धावा केल्या. सूर्याच्या या खेळीमुळे मुंबईने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. यासह मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

सूर्याला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी संधी

सूर्यकुमारला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 टी 2o सामने खेळणार आहे. सध्या टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेनंतर टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम :

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

क्रिकेट की बॅडमिंटन? होता द्विधा मनस्थितीत, IPL मधून घरोघरी पोहचला, आता टीम इंडियाकडून खेळणार

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

(suryakumar yadav on virat kohli)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.