IND vs USA : गंभीरचा एक मेसेज आणि सूर्याने गेम फिरवला, कॅप्टनने सांगितला टर्निंग पॉइंट

Suryakumar Yadav On Gautam Gambhir Post Match Presentation: टीम इंडिया अडचणीत असताना हेड कोच गौतम गंभीरने दिलेल्या एका मेसेजमुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव याने कमाल करुन दाखवली. कॅप्टन सूर्यानेच याबाबत विजयानंतर प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या.

IND vs USA : गंभीरचा एक मेसेज आणि सूर्याने गेम फिरवला, कॅप्टनने सांगितला टर्निंग पॉइंट
T20i Wc 2026 Suryakumar Yadav IND vs USA Post Match
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 08, 2026 | 4:49 AM

सूर्यकुमार यादव याने टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत कर्णधार म्हणून पदार्पण केलं. सूर्याने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला जिंकवलं. भारताने संघर्षपूर्ण अशा सामन्यात यूएसवर मात केली. भारताने यासह या स्पर्धेत विजयी सुरुवात केली. भारताचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग नववा विजय ठरला. सूर्याचं होम ग्राउंड असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडिया अडचणीत सापडलेली. मात्र सूर्याने निर्णायक क्षणी चिवट खेळी केली. सूर्याच्या नाबाद 84 धावांच्या या खेळीच्या जोरावर भारताने 161 धावांपर्यंत मजल मारली. यूएसएला 162 धावांचा पाठलाग करताना 132 पर्यंतच पोहचता आलं. भारताने यासह यूएसएला सलग दुसऱ्यांदा पराभूत केलं. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या विजयानंतर भावना व्यक्त केल्या. सूर्याने हेड कोच गौतम गंभीरबाबत काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.

सूर्या गंभीरबाबत काय म्हणाला?

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात फार दबाव होता. मात्र हेड कोच गौतम गंभीरने दबावात असताना शांतपणे खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फार मदत झाल्याचं सूर्याने सामन्यानंतर प्रेझेंटेटरसोबत बोलताना सांगितलं. बॅटिंग करताना झालेल्या ड्रिंक ब्रेक दरम्यान गंभीरने काय सांगितलं याची माहिती सूर्याने दिली. “फक्त शेवटपर्यंत बॅटिंग करत रहा. नंतर वेगात धावा करशील”, असं गंभीरने बॅटिंगदरम्यान ड्रिंक ब्रेकमध्ये सांगितल्याचं सूर्या म्हणाला.

“ही खेळपट्टी 180-190 धावांची नाही असं वाटत होतं. या खेळपट्टीवर 140 च्या आसपास धावा होतील. गौती भाईनेही (गौतम गंभीर) 14 व्या ओव्हरनंतर ड्रिंक ब्रेक दरम्यान मला असंच सांगितलं. गौती भाईने मला शेवटपर्यंत बॅटिंग करण्याच्या प्रयत्न कर, शेवटी तु फटकेबाजी करुन धावा वसुल करु शकतोस, असा विश्वास दिला”, असं सूर्याने म्हटलं.

सूर्याचा आत्मविश्वास

“6 आऊट 77 रन्स अशी स्थिती असताना माझ्यावर किती दबाव होता हे मीच सांगू शकतो. मात्र मी अशाच स्थितीत याआधी बॅटिंग केलीय, हा आत्मविश्वास होता. मी मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि इतर मैदानात खूप खेळलोय. त्यामुळे शेवटपर्यंत बॅटिंग केली तर मी फरक पाडू शकेन हा विश्वास होता”, असं सूर्याने म्हटलं.

सूर्याची झुंजार खेळी

टीम इंडियाची 12.4 ओव्हरमध्ये 6 आऊट 77 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र इथून लोकल बॉय सूर्याने कमाल केली. सूर्याने यूएसए विरुद्ध किल्ला लढवला. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. सूर्याच्या या खेळीमुळेच भारताला 9 विकेट्स गमावून 161 धावा करता आल्या. मात्र यूएसए टीमला 132 धावाच करता आल्या.