AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखला ‘पठाण’गिरी पडली महागात, रिलीज केलेले ‘हे’ खेळाडू घालतायेत धुमाकूळ

केकेआरला आता होत असेल पश्चाताप, 'ती' चूक आता जर नाही सुधारलं तर होऊ शकतं मोठं नुकसान

शाहरुखला 'पठाण'गिरी पडली महागात, रिलीज केलेले 'हे' खेळाडू घालतायेत धुमाकूळ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 03, 2023 | 10:54 PM
Share

मुंबई : भारतीय संघातील युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना खूश केलं आहे. यामध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये युवा खेळाडूंचा दरारा पाहायला मिळाला. रनमशीन सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav), शुभमन गिल (Shubman Gill) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांनी सर्वांच्या नजरा खेचून घेतल्या.  शुबमन गिलने आताच वनडेमध्ये द्विशतक आणि टी-20 मध्ये शतकी खेळी केली. सूर्या आता जगातील टी-20 मधील नंबर एकचा बॅट्समन आहे. याआधी दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये एकाच संघामध्ये खेळत होते.  केकेआरने मात्र या मॅचविनर खेळाडूंना रिलीज केलं आणि मोठी चूक केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाखाली गौतम गंभीर खेळत असताना सूर्यकुमार यादव संघात होता.

सूर्याला पहिल्यांदा मुंबई इंडिअन्सने विकत घेतलं होतं. मात्र त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. 2014 ला त्याला केकआर संघाने विकत घेतलं होतं मात्र 2018  परत त्याला मुंबईने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. सूर्यकुमार यादव केकेआरकडून खेळत असताना सहाव्या, सातव्या स्थानी खेळायला यायचा. मात्र गंभीर दुसऱ्या संघात गेल्यावर टीम मॅनेजमेंटने सूर्यकुमारलाही रिलीज केलं होतं.

सूर्याला मुंबई इंडिअन्सने आपल्या ताफ्यात दाखल केलं. वरच्या स्थानावर खेळायला संधी मिळाल्यावर त्याने संधीचं सोन केलं आणि थेट टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं. आता सूर्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज बनला असून त्याला टी-20 संघाचं उपकर्णधारपदही देण्यात आलं आहे.

2018 चा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्यावर शुभमन गिलला आयपीएलमध्ये केकेआर संघाने  आपल्या स्क्वॉडमध्ये सामील करून घेतलं आहे. शुभमन केकेआरनंतर गुजरात टायटन्स संघाकडून खेळत असून पहिल्याच वर्षी विजेतेपदावर नाव कोरलं. चार हंगामातील 55 डावांमध्ये 1,147 धावा केल्या यामधील गुजरातकडून खेळताना 16 डावांमध्ये 483 धावा केल्या.

राहुल त्रिपाठीने 2017 साली पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना कमाल कामगिरी केली होती. 2018 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले राहिले नाही. राजस्थान रॉयल्ससाठी त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. 2020 मध्ये तो केकेआरमध्ये आला आणि सर्व काही बदलले. कोलकाताकडून त्याने 27 डावात 627 धावा केल्या. मात्र केकेआरने त्याला रिटेन केलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राहुलने केलेल्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात निवड झाली. यंदाच्या वर्षी राहुलने श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये पदार्पण केलं.

दरम्यान, केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा, नितीष राणा, व्यंकटेश अय्यर आणि कुलदीप यादव यांनी चमकदार कामगिरी करत खेळाडूंनी टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच