SMAT 2021: अजिंक्य रहाणेची वादळी खेळी, पृथ्वी शॉची साथ, मुंबईची बडोद्यावर 82 धावांनी मात

बडोद्याविरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी केली. गुवाहाटीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या ब गटाच्या सामन्यात पृथ्वी शॉने अजिंक्य रहाणेसह मुंबईच्या डावाची सुरुवात केली.

SMAT 2021: अजिंक्य रहाणेची वादळी खेळी, पृथ्वी शॉची साथ, मुंबईची बडोद्यावर 82 धावांनी मात
Ajinkya Rahane
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 3:59 PM

मुंबई : वाढदिवसाच्या दिवशी धमाका तर व्हायलाच हवा, मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने नेमके तेच केले. पृथ्वी शॉच्या 83 धवांच्या वादळी खेळीच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईने बडोद्यावर 82 धावांनी विजय मिळवला. ही वादळी खेळी खेळण्यासाठी त्याने वाढदिवसाचा मुहुर्त साधला. पृथ्वी शॉचा आज 22 वा वाढदिवस आहे. आज न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. त्यामुळे आजच्या अर्धशतकी खेळीसह पृथ्वीने टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. त्यामुळे बर्थडे बॉय पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड करुन निवड समिती त्याला वाढदिवसाचं गिफ्ट देऊ शकते. (Syed Mushtaq Ali Trophy 2021 : Mumbai defeated New Zealand with help of Ajinkya Rahane and Prithvi Shaw half centuries)

बडोद्याविरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी केली. गुवाहाटीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या ब गटाच्या सामन्यात पृथ्वी शॉने अजिंक्य रहाणेसह मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 151 धावांची मोठी भागीदारी केली. रहाणे बाद झाल्याने ही जोडी फुटली. अजिंक्य रहाणेने अवघ्या 45 चेंडूत 71 धावांची धमाकेदार खेळी केली. रहाणेच्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. बरं, रहाणे बाद झाल्यानंतरही पृथ्वी शॉ टिकून खेळला.

वाढदिवसाला पृथ्वी शॉचा धमाका

9 नोव्हेंबर 1999 रोजी जन्मलेल्या, म्हणजेच आज दिवशी 22 वर्षांचा झालेल्या पृथ्वी शॉने सामन्यात 63 चेंडूंचा सामना करत 83 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. म्हणजेच शॉने आपल्या डावात अवघ्या 10 चेंडूत 48 धावा फटकावल्या. पृथ्वी आणि रहाणेने रचलेला पाया शिवम दुबेने 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 23 धावा करत मोठ्या धावसंख्येच्या बुलंद इमारतीत बदलून टाकले. परिणामी मुंबईने 20 षटकांत 2 गडी गमावून 193 धावा केल्या.

बडोद्यावर 82 धावांनी विजय

बडोद्याच्या संघासमोर 194 धावांचे मोठे लक्ष्य होते, पण या मोठ्या धावसंख्येसमोर त्यांचा संघ 111 धावांवरच थांबला. अशाप्रकारे बडोद्याचा संघ मुंबईने दिलेल्या विजयाच्या लक्ष्यापासून 82 धावा दूर राहिला. बडोद्याने 20 षटकांत 9 गडी गमावले. मुंबईसाठी तनुस कोट्यान हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकात 16 धावा देत 4 बळी घेतले.

इतर बातम्या

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

विराटने इशाऱ्यांमध्ये सांगितलं भावी कर्णधाराचं नाव, विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात कोहली भावूक

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, ऋतुराज गायकवाडची जागा पक्की, रोहितकडे कर्णधारपद?

(Syed Mushtaq Ali Trophy 2021 : Mumbai defeated New Zealand with help of Ajinkya Rahane and Prithvi Shaw half centuries)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.