न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, ऋतुराज गायकवाडची जागा पक्की, रोहितकडे कर्णधारपद?

T20 विश्वचषक 2021 मध्ये जे काही घडले ते विसरून आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या T20 मालिकेकडे लागले आहे, ज्यासाठी मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, ऋतुराज गायकवाडची जागा पक्की, रोहितकडे कर्णधारपद?
Rohit Sharma - Ruturaj Gaikwad
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 2:39 PM

मुंबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये जे काही घडले ते विसरून आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या T20 मालिकेकडे लागले आहे, ज्यासाठी मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या मालिकेत टीम इंडियाच्या 7 खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. विश्रांती घेतलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन आणि ऋषभ पंत यांची नावे आहेत. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूर येथे होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून टी-20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाऊ शकते. (Senior players rest in Home T20 series against New Zealand, Rituraj Gaikwad’s place confirmed, Rohit will be captain)

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याची निवड होऊ शकत नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पांड्याला विश्रांती न देता थेट संघातून वगळले जाऊ शकते. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करू पाहणाऱ्या व्यंकटेश अय्यरला पांड्याच्या जागी संधी दिली जाऊ शकते शकते, निवडकर्ते तसा विचर करत आहेत. फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर आणि अक्षर पटेल हे त्रिकूट संघात कायम राहील.

अहवालानुसार, फलंदाजीच्या आघाडीवर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची संघात निवड होणार आहे. याशिवाय इशान किशनही संघात असणार आहे. यष्टीरक्षक म्हणून त्यालाच पहिली पसंती मिळेल. तर मधल्या फळीत श्रेयस अय्यर संघात आपले स्थान पक्के करताना दिसू शकतो.

शमी आणि बुमराहला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे गोलंदाजीची कमान दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे असेल. जयपूरमध्ये टी-20 मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर दुसरा सामना रांचीमध्ये आणि तिसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाईल. यानंतर 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये कसोटी मालिका सुरू होईल.

न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर, ट्रेंट बोल्टला विश्रांती

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ भारत दौऱ्यावर येणार असला तरी ट्रेंट बोल्टला त्यात स्थान देण्यात आलेले नाही. बोल्टशिवाय कॉलिन डी ग्रँडहोम देखील संघाचा भाग असणार नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या म्हणण्यानुसार या दोघांनाही या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. किवी संघ 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील त्यांची मोहिम संपल्यानंतर भारताचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

भारत दौऱ्यासाठी किवी संघात 5 फिरकीपटू

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपल्या कसोटी संघात 5 फिरकी गोलंदाज ठेवले आहेत. किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीचा खेळ पाहणे रंजक ठरेल. तो म्हणाला की बोल्ट आणि ग्रँडहोमला विश्रांती देण्यामागे संघाचे रोटेशन धोरण आणि बायोबबल हे कारण आहे.

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, ​​नील वॅगनर

इतर बातम्या

…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Senior players rest in Home T20 series against New Zealand, Rituraj Gaikwad’s place confirmed, Rohit will be captain)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.