SMAT 2025: बिहार संघाचा वैभव सूर्यवंशी असूनही दारूण पराभव, 175 धावा गाठताना झाले असे हाल

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहारला आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मध्य प्रदेशने विजयासाठी 175 धावंचं आव्हान ठेवलं होतं. बिहारने हे आव्हान गाठताना नांगी टाकून दिली. वैभव सूर्यवंशीही काही खास करू शकला नाही.

SMAT 2025: बिहार संघाचा वैभव सूर्यवंशी असूनही दारूण पराभव, 175 धावा गाठताना झाले असे हाल
SMAT 2025: बिहार संघाचा वैभव सूर्यवंशी असूनही दारूण पराभव, 175 धावा गाठताना झाले असे हाल
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 28, 2025 | 4:36 PM

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहारची सुरुवात काही चांगली झाली नाही. टी20 फॉर्मेटमधील या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चंदीगडनंतर मध्य प्रदेशने पराभवाची धूळ चारली आहे. एलीट ग्रुपच्या 19व्या सामन्यात बिहार आणि मध्य प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. बिहारने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 175 धावांचं आव्हान दिलं होतं. पण बिहाराचा संघ 20 षटकंही पूर्ण खेळू शकला नाही आणि तंबूत परतला. भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्यामुळे बिहारच्या पराभव त्याच्या विकेटनंतर निश्चित झाला होता. बिहारच्या इतर फलंदाजांनीही काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे 19.2 षटकात संपूर्ण संघ 112 धावा करून बाद झाला. मध्य प्रदेशने हा सामना 62 धावांनी जिंकला.

मध्य प्रदेशने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार शाकिबुल गनी आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 12 धावा केल्या. पण शाकिबुल गनी पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर 12 धावा करून बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीही संघाच्या 32 धावा असताना बाद झाला. शिवम शुक्लाने त्याची विकेट काढली. वैभव सूर्यवंशीने 9 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत 13 धावा केल्या. बिहारकडून बिपिन सौरभने सर्वाधिक 32 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांच पुढे जाऊ शकला नाही. तळाचे फलंदाज तर एकेरी धावांवर तंबूत परतले.

मध्य प्रदेशकडून हर्ष गवळी आणि वेंकटेश अय्यर यांनी चांगली खेळी केली. हर्ष गवळीने 44 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 50 धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने 34 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 55 धावांची खेळी केली. बिहारकडून मोहम्मद इजहारने 4 षटकात 39 धावा देत 4 विकेट काढल्या. तर सूरज कश्यपला एक विकेट मिळाली. तर मध्य प्रदेशकडून शिवांग कुमारने 3, त्रिपुरेश सिंगने 2, शिवम शुक्लाने 2, वेंकटेश अय्यरने 1 आणि राहुल बाथने 1 विकेट काढली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

मध्य प्रदेश (प्लेइंग इलेव्हन): अंकुश सिंग, अभिषेक पाठक, हर्ष गवळी, हरप्रीत सिंग भाटिया (कर्णधार), अनिकेत वर्मा, व्यंकटेश अय्यर, राहुल बाथम, शिवांग कुमार, त्रिपुरेश सिंग, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय.

बिहार (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, साकिबुल गनी (कर्णधार), आयुष लोहारुका (विकेटकीपर), खालिद आलम, बिपिन सौरभ, पीयूष सिंग, आकाश राज, सूरज कश्यप, भानू कुमार, नवाज खान, मोहम्मद सलाहुद्दीन इझहार