IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान भिडणार, डिसेंबरमध्ये येणार आमनेसामने
भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होत नाही. पण आयसीसी आणि मल्टी नेशन स्पर्धेत दोन्ही संघ भिडतात. त्यामुळे या स्पर्धांशिवाय दोन्ही संघ आमनेसामने येत नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दोन्ही संघ भिडणार आहेत.

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून 15 फेब्रुवारीला भिडणार आहेत. या दिवसाची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. पण या टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. त्याचं वेळापत्रकही समोर आलं आहे. अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत दोन्ही संघ भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. ही स्पर्धा वनडे फॉर्मेट खेळली जाणार आहे. भारताच पहिला सामना 12 डिसेंबरला होणार आहे तर भारत पाकिस्तान 14 डिसेंबरला आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणाही केली आहे.
कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आलं आहे. वैभवने नुकतंच रायझिंग आशिया कप 2025 स्पर्धेत भारत ए संघाकडून खेळला होता. तेव्हा त्याने युएईविरुद्ध आक्रमक शतकी खेळी केली होती. त्यानंतरही त्याचा झंझावात सुरुच होता. पण या स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरी काही गाठू शकला नाही. बांगलादेशविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
आतापर्यंत आशिया कप स्पर्धेची 11 पर्व पार पडली आहेत. भारताने आठवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. यात एका स्पर्धेत भारत पाकिस्तान संयुक्त विजेते आहेत. त्यानंतर बांगलादेशने दोनदा आणि अफगाणिस्तानने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात बांगलादेशने भारताला 59 धावांनी पराभूत करून जेतेपद जिंकलं होतं. आता बांगलादेशकडे जेतेपदाची हॅटट्रीक साधण्याची संधी आहे. आशिया कप 2025 स्पर्धेचं यजमानपद युएईकडे आहे.
अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंह, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, नमन पुष्पक, डी. दीपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंह, उद्धव मोहन, एरॉन जॉर्ज.
