Prithvi Shaw : पृथ्वी शॉ याची अचानक टीममध्ये एन्ट्री, आणखी कुणाचा समावेश?

Prithvi Shaw : बर्थडे बॉय पृथ्वी शा याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. जाणून घ्या पृथ्वीसह कुणाला संधी मिळाली?

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ याची अचानक टीममध्ये एन्ट्री, आणखी कुणाचा समावेश?
prithvi shaw
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 10:53 PM

स्टार बॅट्समन पृथ्वी शॉ गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. इतकंच नाही, तर पृथ्वीला काही दिवसांपूर्वी बेशिस्तपणा आणि तब्येतीमुळे मुंबई टीममधूनही बाहेर करण्यात आलं. त्यामुळे एकूणच पृथ्वीला धावांसाठी आणि संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या या खेळाडूचा आज 9 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. अशात या बर्थडे बॉयला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अर्थात 8 नोव्हेंबरला आनंदाची बातमी मिळाली आहे.

पृथ्वी शॉ याचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे. पृथ्वीची आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी शुक्रवारी 8 नोव्हेंबरला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी 28 संभावित नावांची घोषणा केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई निवड समितीने 28 संभावित खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या संघात पृथ्वी शॉ व्यतिरिक्त मुंबईचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात असणार आहे. पृथ्वीला आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिट्ल्सने रिटेन केलेलं नाही.

पृथ्वीची निराशाजनक कामगिरी

दरम्यान पृथ्वीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या 2 सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पृथ्वीने पहिल्या सामन्यात 7 आणि 12 धावा केल्या. तर पृथ्वीने महाराष्ट्रविरुद्ध 1 आणि 39 धावा केल्या. तर इराणी ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीने 4 आणि 76 धावा केल्या.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई टीम

पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, जय बिस्टा, श्रीराज घरत, अजिंक्य रहाणे , श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, ईशान मूलचंदानी, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), आकाश आनंद (विकेटकीपर), साईराज पाटील, आकाश पारकर, शम्स मुलानी , हिमांशु सिंह, सागर छाबड़िया, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, योगेश पाटील, हर्ष तन्ना, इरफान उमेर, विनायक भोईर, कृतिक हनागावडी, शशांक अतारडे आणि जुनेद खान.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.