AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: भारत-पाक महामुकाबल्याची सर्व तिकिटं Sold out, मॅचला अजून आठ महिने बाकी

यूएई: भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामन्याचा प्रेक्षकवर्ग फक्त दोन देशातच नव्हे, तर जगभरात आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची मोठी उत्सुक्ता असते. सामना सुरु होण्याच्या कित्येक दिवस आधीपासून चर्चा सुरु होते. हा सामना म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी युद्धापेक्षा कमी नसतो. कारण पराभव कुठल्याच बाजूला मान्य नसतो. फक्त विजयच हवा ही भावना असते. या […]

T20 World Cup 2022: भारत-पाक महामुकाबल्याची सर्व तिकिटं Sold out, मॅचला अजून आठ महिने बाकी
Ind vs Pak
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 4:25 PM
Share

यूएई: भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामन्याचा प्रेक्षकवर्ग फक्त दोन देशातच नव्हे, तर जगभरात आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची मोठी उत्सुक्ता असते. सामना सुरु होण्याच्या कित्येक दिवस आधीपासून चर्चा सुरु होते. हा सामना म्हणजे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी युद्धापेक्षा कमी नसतो. कारण पराभव कुठल्याच बाजूला मान्य नसतो. फक्त विजयच हवा ही भावना असते. या सामन्याची प्रेक्षकांना किती उत्सुक्ता आहे, त्याची कल्पना तिकीट विक्रीवरुनच आली. आज ICC ने टी-20 (T20 World Cup) वर्ल्डकपची तिकीट विक्री सुरु केली. तिकिट विक्री सुरु होताच, अवघ्या तासाभरात भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिट विकली गेली. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याला अजून आठ महिन्यांचा कालवधी बाकी आहे. 23 ऑक्टोबर 2022 रोजी मेलबर्नच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या MCG च्या स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याची सर्व तिकिट सोल्ड आऊट झाली आहेत.

भारत-पाक सामन्याच्या 60 हजार तिकिटांची विक्री

ज्यांना काहीही करुन मैदानावर जाऊन हा सामना पाहायचा होता, त्या प्रेक्षकांना आता घरच्या टीव्हीसमोर बसून भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यंदाचा टी-20 वर्ल्डकप होणार आहे. आतापर्यंत आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या दोन लाख तिकिटांची विक्री झाली आहे. यात 60 हजार तिकिटं फक्त भारत-पाकिस्तान सामन्याची आहेत. या सामनाच्यावेळी MCG चं स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं असेल.

भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय टी20 वर्ल्डकपची फायनल तसचं साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याची तिकीटही मोठ्या प्रमाणात विकली गेली आहेत.

भारत-पाकिस्तान सातव्यांदा येणार आमने-सामने टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात 23 ऑक्टोबरला सातव्यांदा भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. याआधीच्या सहा लढतीत भारत चारवेळा तर पाकिस्तान एकदा जिंकला आहे. एक सामना टाय झाला होता. ऑस्ट्रेलियात दोन्ही देशांमध्ये टी 20 वर्ल्डकपचा पहिला सामना होत आहे.

T 20 world cup 2022 Australia Melbourne india vs pakistan match tickets sold out in a few minutes the match will be held on october 23

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.