AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashid Khan: राशिद खानला मोठा झटका! आयसीसीने ठरवलं दोषी, आता ….

Afghanistan Rashid Khan: अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिके विरुद्ध सेमी फायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्याआधी अफगाणिस्तानच कॅप्टन राशिद खान दोषी आढळला आहे.

Rashid Khan: राशिद खानला मोठा झटका! आयसीसीने ठरवलं दोषी, आता ....
rashid khan afghanistan captainImage Credit source: Icc X account
| Updated on: Jun 26, 2024 | 10:29 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट टीमने राशिद खान याच्या नेतृत्वात इतिहास रचला. अफगाणिस्तानने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. अफगााणिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही पहिली वेळ ठरली. आता अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिके विरुद्ध सेमी फायनलमध्ये 27 जून रोजी आमनेसामने असणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याला एक चूक भोवली आहे. राशिदने बांगलादेश विरुद्ध केलेली एक कृती भोवलीय. त्यामुळे आयसीसीने राशिदला फटकारलं आहे.

राशिद खानने बांगलादेश विरूद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंग करताना सहकारी फलंदाजने दुसरी धाव घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे राशिदने संताप व्यक्त करत आपली बॅट फेकली होती. राशिदच्या या कृतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राशिद खान दोषी ठरवण्यात आलं आहे. राशिदकडून आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आलंय. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

नक्की काय झालं होतं?

राशिद खानने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या डावात बॅटिंग दरम्यान सहकाऱ्यावर राग व्यक्त करण्यासाठी बॅट फेकली होती. बॅटिंग दरम्यान 20 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. राशिदसोबत करीम जनात बॅटिंग करत होता. स्ट्राईकवर असलेल्या राशिदने 1 धाव घेतली आणि तो दुसऱ्या धावेसाठी इच्छूक होता. राशिद जवळपास अर्ध्या वाटेत पोहचला होता. मात्र करीमने नकार देत त्याला माघारी फिरायला भाग पाडलं. राशिदने त्या रागातून बॅट फेकून आपला संताप व्यक्त केला होता.

राशिद खानला मोठा झटका

दरम्यान त्या सामन्यात राशिद खान याने 3 सिक्ससह निर्णायक 19 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 115 धावांपर्यंत मजल मारली. मात्र पावसामुळे 1 ओव्हर कमी करण्यात आली. त्यामुळे बांगलादेशला 114 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली. अफगाणिस्तानने बांगलादेशला 17.5 ओव्हरमध्ये 105 धावांवर ऑलआऊट करुन सामना जिंकल आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता अफगाणिस्तान 27 जून रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध सेमी फायनल सामन्यात 2 हात करणार आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.