AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Twenty: कसोटी स्टाईलमध्ये टी20, क्रिकेटचा नवा फॉर्मेट या दिवशी होणार लाँच; असा आहे नियम

क्रिकेटचे सध्या तीन फॉर्मेट प्रचलित आहेत. यात टी20, वनडे आणि कसोटी हे फॉर्मेट सर्वांनाच माहिती आहेत. आता क्रिकेटच्या चौथ्या फॉर्मेटची यात भर पडणार आहे. हा फॉर्मेट जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे.

Test Twenty: कसोटी स्टाईलमध्ये टी20, क्रिकेटचा नवा फॉर्मेट या दिवशी होणार लाँच; असा आहे नियम
Test Twenty: कसोटी स्टाईलमध्ये टी20, क्रिकेटचा नवा फॉर्मेट या दिवशी होणार लाँच; असा आहे नियमImage Credit source: PTI
| Updated on: Oct 17, 2025 | 3:46 PM
Share

क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये गेल्या काही वर्षात बरेच बदल होत गेले. आतापर्यंत तीन फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. टी20, वनडे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये सध्या क्रिकेट खेळलं जात आहे. आता क्रिकेटच्या चौथ्या फॉर्मेटचा उदय होत आहे. यामुळे क्रिकेटचा रोमांच आणखी वाढणार आहे. टेस्ट आणि टी20 फॉर्मेटचा मिलाफ नव्या फॉर्मेटमध्ये पाहायला मिळणार आहे. हा जगातील पहिला 80 षटकांचा फॉर्मेट असणार आहे. दोन्ही संघांना कसोटीसारखं 20-20 षटकांचे दोन डाव खेळण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करणार आहे. जसं कसोटी सामन्यात होतं अगदी तसंच..या फॉर्मेटमध्ये कसोटी आणि टी20 क्रिकेटचे दोन्ही नियम लागू होणार आहे.

टेस्ट ट्वेंटी सामन्याचा निकाल कसा लागणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या सामन्यात विजय, पराभव, टाय किंवा सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. यामुळे कसोटीसह टी20 क्रिकेटचा आनंदही लुटता येणार आहे. एखादा संघ पहिल्या डावात 75 धावांनी पिछाडीवर असेल तर त्याला फॉलो-ऑन खेळावा लागेल. पण या फॉर्मेटमध्ये चेंडू लाल की पांढरा वापरायचा हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. प्रत्येक संघात एकूण 16 खेळाडू असतील आणि पहिल्या पर्वात सहा संघ असण्याची शक्यता आहे. टेस्ट ट्वेंटीचं पहिलं पर्व 2026 पासून सुरु होणार आहे. ही फक्त 19 वर्षाखालील स्पर्धा असेल. ही स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे.

या फॉर्मेटच्या लिलावात 96 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सर क्लाइव लॉयड यांनी सांगितलं की, ‘क्रिकेटचं प्रत्येक युग पाहिल्यानंतर मी एक गोष्ट सांगू शकतो की खेळ कायम अनुकूल राहीला आहे. पण मुद्दाम असं काहीच नाही. कसोटी ट्वेंटी खेळाची लय परत आणेल आणि आधुनिक उर्जेसह जिवंत ठेवेल.’

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू क्लाइव लॉयड, दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह हे खेळाडू टेस्ट ट्वेंटी फॉर्मेटच्या सल्लाकार बोर्डमध्ये असणार आहे. यासह राजस्थान रॉयल्सचा माजी सीईओ मायकल फोर्डहम यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केलं आहे. दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांनी सांगितलं की, ‘क्रिकेटच्या नव्या फॉर्मेटमुळे उत्साह वाढणार आहे. यामुळे तरुण खेळाडूंना खूप साऱ्या संधी मिळतील.’

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.