T20 WC 2026: भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी अमेरिका संघ सुपर 8 फेरीच्या शर्यतीत, आता असं असेल गणित

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यापूर्वी अ गटातून नामिबियाचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीच्या दोन जागांसाठी चार संघात चुरस असणार आहे. त्यापैकी भारत पाकिस्तान सामन्यानंतर एक संघाचं गणित सुटणार आहे. तर तीन संघात एका जागेसाठी रस्सीखेंच असेल.

T20 WC 2026: भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी अमेरिका संघ सुपर 8 फेरीच्या शर्यतीत, आता असं असेल गणित
T20 WC 2026: भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी अमेरिका संघ सुपर 8 फेरीच्या शर्यतीत, आता असं असेल गणित
Image Credit source: USA Cricket Twitter
| Updated on: Feb 15, 2026 | 7:07 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीतील संघांचं गणित आता सुटताना दिसत आहे. भारत असलेल्या अ गटात आता तसंच पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि नामिबिया सामन्यानंतर या गटाचं चित्र बदललं आहे. अमेरिकेने नामबियाला 31 धावांनी पराभूत केलं. नामिबियाचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे या गटातून बाद होणार पहिला संघ ठरला आहे. आता भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँड हे संघ शर्यतीत आहे. दोन जागांपैकी एका जागेचा निकाल हा भारत पाकिस्तान सामन्यात लागणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला सुपर 8 फेरीत स्थान मिळणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला नेदरलँड आणि अमेरिकेशी तुलना करावी लागणार आहे. पण नेट रनरेटचं गणित पाहिलं तर अमेरिका आणि नेदरलँड हे गणित सोडवतील असं वाटत नाही.

अ गटातून अमेरिका चारही सामने खेळली आहे. चार पैकी दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. अमेरिकेच 4 गुण आणि नेट रनरेट +0.787 इतका आहे. यासह या गटात तिसऱ्या स्थानावर आहे. आता अमेरिकेच्या हातात तसं काही नाही. पण नेट रनरेटच्या आधारावर फक्त संधी मिळू शकते. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यावर नजर असेल. या सामन्यात एखादा संघ मोठ्या फरकाने पराभूत झाला तर अमेरिकेला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळेल. पण त्यातही एक समीकरण असेल. त्यामुळे चमत्कार झाला तरच सुपर 8 फेरीचं तिकीट मिळेल.  पण हे गणित कसं आहे ते समजून घ्या.

भारत पाकिस्तान सामन्यातील पराभूत संघाला आणखी एक सामना खेळायचा आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये येण्याची संधी आहे. पाकिस्तान नामिबिया विरुद्ध आणि भारत नेदरलँडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यात पराभूत झालेल्या संघाला संधी आहे. शेवटचा सामना जिंकला तर सुपर 8 फेरीचं तिकीट मिळेल. पण पराभूत झाले तर मात्र नेट रनरेटच्या आधारावर गणित सुटेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us