T20 World Cup: सेमीफायनलमध्ये पाऊस झाला, तर कसा लागणार निकाल? जाणून घ्या नियम

T20 World Cup 2022 च्या सेमीफायनल आणि फायनलच्यावेळी पाऊस कोसळला, तर निकाल कसा लावणार? ते जाणून घ्या....

T20 World Cup: सेमीफायनलमध्ये पाऊस झाला, तर कसा लागणार निकाल? जाणून घ्या नियम
T20 World Cup 2022 : Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 4:46 PM

मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी 20 वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या वर्ल्ड कपमध्ये पावसाचा व्यत्यय सतत पहायला मिळतोय. यावेळी पावसाने अनेक टीम्सच सेमीफायनलच गणित बिघडवलय. खुद्द यजमान ऑस्ट्रेलियाचा एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. सध्याच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाला, तर पॉइंटसची विभागणी होते. आता नॉकआऊट मॅच म्हणजे सेमीफायनल आणि फायनलच्यावेळी पाऊस झाला, तर निकाल कसा लागणार? ते जाणून घ्या.

आता सुपर 12 चा नियम नाही

सुपर 12 साठी जे नियम आहेत, त्यानुसार पावसामुळे सामना झाला नाही, तर पॉइंटसची समसमान विभागणी होते. दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट दिला जातो. पण आता सेमीफायनल आणि फायनलच्यावेळी पाऊस झाला तर काय?

कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा

आयसीसीने दोन्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी रिजर्व डे ठेवला आहे. म्हणजे पावसामुळे सामना सुरु झाला नाही, तर दुसऱ्यादिवशी सामना होईल. सामन्यादरम्यान पाऊस झाला, तर दोन्ही इनिंग्समध्ये पाच-पाच ओव्हरचा खेळ होण्याची वाट पाहिली जाणार नाही. सेमीफायनल आणि फायनलसाठी दोन्ही इनिंग्समध्ये कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा आहे. असं झालं नाही, तर मॅच रिजर्व डे च्या दिवशी सुरु होईल.

13 नोव्हेंबरला फायनल

टी 20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीत 9 नोव्हेंबरला होईल. दुसरी सेमीफायनल 10 नोव्हेंबरला एडिलेड ओव्हलमध्ये होईल. वर्ल्ड कपची फायनल 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात होईल. भारतीय वेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता फायनल सुरु होईल.

न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम

शुक्रवारी न्यूझीलंडची टीम टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. केन विलियमसनने 35 चेंडूत 61 धावा फटकावल्या. आयर्लंडला 35 धावांनी हरवून न्यूझीलंडच्या टीमने सेमीफायनल गाठली. न्यूझीलंडचे पाच मॅचमध्ये सात पॉइंट्स आहेत. रनरेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपेक्षा चांगला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.