पॅट कमिन्सच्या त्या व्हिडीओवर अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने दिलं उत्तर, म्हणाला “Definitely Australia..”

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अफगाणिस्ताने सुपर 8 फेरीत पराभूत केल्यानंतरच आव्हान डळमळीत झालं होतं. त्यानंतर भारताने हरवलं आणि थेट बाहेरचा रस्ता दाखवला. पण असं असताना पॅट कमिन्सचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचा संदर्भ पकडून अफगाणिस्तानच्या खेळाडूने डिवचलं आहे.

पॅट कमिन्सच्या त्या व्हिडीओवर अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने दिलं उत्तर, म्हणाला Definitely Australia..
| Updated on: Jun 25, 2024 | 6:49 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे. सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला पराभूत करत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. आता उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित चुकल्यानंतर पॅट कमिन्सच्या व्हिडीओचा संदर्भ घेत नजिबुल्लाह जाद्रानने पोस्ट केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पॅट कमिन्स यांना डिवचलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पॅट कमिन्सने एक भाकीत केलं होतं. यात ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठणार हे निश्चित आहे असं त्याने सांगितलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर पॅट कमिन्सचा आत्मविश्वास जबरदस्त होता. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मनासारखं झालं नाही. पॅट कमिन्स त्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाला होता ते सुरुवातीला जाणून घेऊयात

अँकरने पॅट कमिन्सला विचारलं होतं की, कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठेल. तेव्हा पॅटने सांगितलं क, निश्चितच ऑस्ट्रेलिया..तेव्हा अँकरने विचारलं की इतर तीन संघांबाबत काय सांगशील? तेव्हा पॅटने उत्तर दिलं की, ‘आम्ही त्याची चिंता करत नाहीत.’ आता हाच धागा पकडून अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजिब जाद्रानने ट्वीट केलं आहे.

प्रश्न: कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठतील?
उत्तर: निश्चितच ऑस्ट्रेलिया..इतर तीन तुम्ही निवडा..

इतकंलिहून त्याने विमानाचे इमोजी टाकले आहेत. तसेच पुढे तोंडावर बोट ठेवलेला स्माईली आणि त्यानंतर तोंड गप्प केलेला स्माईली टाकला आहे. इतकंच काय तर ही पोस्ट पॅट कमिन्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला टॅग केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत अफगाणिस्तानने न्यूझीलंडला धोबीपछाड दिला होता. त्यानंतर सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलियाला दणका दिला आहे. त्यानंतर बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. आता अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंडशी होणार आहे. 27 जूनला हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे.