
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 17 व्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद आहे. तर जॉस बटलर इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. एशेस रायव्हलर्स असणाऱ्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या दोन्ही संघांसाठी हा प्रतिष्ठेचा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही संघ गतविजेता आहेत. ऑस्ट्रेलियाने 2023 साली टीम इंडियाला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. तर इंग्लंडने 2022 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे या दोन्ही गतविजेत्यांमध्ये हा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2007 पासून सुरुवात झाली. तेव्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवला होता. मात्र तेव्हापासून ते गेल्या 2022 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे मिचेल मार्शच्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसमोर गेल्या 17 वर्षांची ही प्रतिक्षा संपवण्याचं आव्हान असणार आहे. आता कांगारु यात यशस्वी ठरणार की इंग्लंड अजिंक्य राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना केव्हा, कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना 8 जून रोजी होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 10 वाजता टॉस होणार आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, ॲश्टन आगर, जोश इंग्लिस आणि कॅमरून ग्रीन.
इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपले, बेन डकेट, सॅम करन आणि टॉम हार्टले.