AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : भारत पाकिस्तान सामन्यावर ‘लोन वुल्फ’ हल्ल्याचं सावट, नेमकं काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सामना 5 जूनला आयर्लंडसोबत होणार आहे. त्यानंतर सर्वांचं लक्ष लागून असलेला भारत पाकिस्तान सामना 9 जूनला होणार आहे. पण या सामन्यावर आता दहशतवाद्यांची काळी सावली पडली आहे. या सामन्यात लोन वुल्फ हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

T20 World Cup : भारत पाकिस्तान सामन्यावर 'लोन वुल्फ' हल्ल्याचं सावट, नेमकं काय ते जाणून घ्या
| Updated on: May 30, 2024 | 1:27 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकेत क्रिकेट बीज रुजावं यासाठी प्रयत्न आहेत. दुसरीकडे, या स्पर्धेत भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ एकाच गटात असून हा सामना 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. न्यूयॉर्कच्या आयसनहोवर पार्कमध्ये तयार केलेल्या नसाउ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. पण हा सामना दहशतवाद्यांच्या रडारवर आला आहे. संबंधित धोका लक्षात घेता शहरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवादी संघटना आयसीस खोरासनने एक व्हिडीओ जारी केला आहे. यात हल्लेखोराला ‘लोन वुल्फ’ हल्ला करण्याचा आदेश दिला आहे. लोन वुल्फ हल्ल्यात एकच दहशतवादी सर्वकाही घडवून आणतो. या हल्ल्यासाठी दहशतवादी कोणाचीच मदत घेत नाही. तसेच एकटाच अनेक निष्पाप लोकांचे बळी घेतो. गेल्या काही वर्षात असे हल्ले वाढले आहेत.

न्यूयॉर्कच्या राज्यपाल कॅथी होचल यांनी सांगितलं की, “वर्ल्डकपमध्ये हल्ल्याचा कोणताही धोका नाही. तरीही पोलिसांनी सुरक्षा चोख ठेवली आहे. आम्हीही या स्थितीवर नजर ठेवून आहोत.” आयसीस खोरासन ही दहशतवादी संघटना 2014 मध्ये पूर्व अफगाणिस्तानमध्ये सक्रीय झाली. या वर्षी मार्चमध्ये रशियाची राजधानी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलवर हल्ला करण्यात आला होता. 22 मार्च रोजी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात 143 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. आयसीस खोरासनने याची जबाबदारी घेतली होती.

दहशतवाद्यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये ड्रोन उडताना दिसत आहे. तसेच 9 जून 2024 ही तारीख लिहिण्यात आली आहे. या दिवशीच भारत पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे या दिवशी ड्रोन हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान स्टेडियमच्या आजूबाजूला नो फ्लाय झोन घोषित करण्याची विनंतती न्यूयॉर्क पोलिसांनी यूएएस एव्हिएशन प्रशासनाला केली आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यावर लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत एकूण चार सामने खेळणार आहे. 5 जूनला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील. 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडा विरुद्ध सामना असेल.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...