
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक या जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागदारीच्या जोरावर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं आहे. नेदरलँड्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला आता विजयासाठी 5.20 च्या नेट रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. आता दक्षिण आफ्रिका या लो स्कोअरिंग सामन्यात 104 धावांचं आव्हान सहज पूर्ण करणार की नेदरलँड्स अपसेटची हॅट्रिक करणार? याकडे लक्ष असणार आहे.
नेदरलँड्सकडून चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर दोघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर एक फलंदाज नाबाद परतला. नेदरलँड्ससाठी विक्रमजीत सिंह याने 17 बॉलमध्ये 1 फोरसह 12 रन्स केल्या. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने 9 बॉलमध्ये 10 धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्स रन आऊट झाला. मायकेल लेविट, तेजा निदामनुरु आणि टिम प्रिंगल यांना भोपळाही फोडता आला नाही. पॉल व्हॅन मीकरेन 1 धावेवर नाबाद परतला. तर सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक या जोडीने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे नेदरलँड्सला 103 धावांपर्यंत मजल मारता आली.
सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक या दोघांनी सातव्या विकेटसाठी 54 धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदारीत सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक दोघांनी अनुक्रमे 26 आणि 23 धावांचं योगदान दिलं. सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने 45 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 षटकारासह 40 रन्स केल्या. तर व्हॅन बीकने 22 बॉलमध्ये 3 फोरसह 23 रन्सचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन आणि एनरिख नॉर्खिया या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
नेदरलँड्स उलटफेर करणार?
𝗔 𝗱𝗶𝗳𝗳𝗶𝗰𝘂𝗹𝘁 𝘀𝘁𝗮𝗿𝘁 😬
Let’s proceed to the 2nd innings ⏩️#Nordek #T20WorldCup #NedvSA pic.twitter.com/1H1mWpGDSI
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) June 8, 2024
नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन: स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन आणि व्हिव्हियन किंगमा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.