
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत यूनायटेड स्टेटस टीमने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवला आहे. यूएसएने पाकिस्तानला विजयासाठी 19 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मराठमोळ्या सौरभ नेत्रवाळकर याच्या बॉलिंगसमोर पाकिस्तानला 1 विकेट गमावून फक्त 13 धावाच करता आल्या आहेत. यूएसएने अशाप्रकारे या स्पर्धेतील दुसरा सामना जिंकला आहे. यूएसए या विजयासह ए ग्रुपमधील नंबर 1 टीम ठरली आहे. तर पाकिस्तानची वर्ल्ड कपमधील सुरुवात पराभवाने सुरुवात झाली आहे. यूएसएच्या या विजयानंतर त्यांचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.
यूएसएने विजयासाठी दिलेल्या 19 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि फखर जमान ही जोडी सुपर ओव्हर खेळायला मैदानात आली. तर यूएसएकडून सौरभ नेत्रवाळकरने सुपर ओव्हर टाकायला आला. सौरभने पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. सौरभने त्यानंतर वाईड बॉल टाकला. सौरभने तिसऱ्या बॉलवर कमबॅक करत इफ्तिखार अहमद याला नितीश कुमार याच्या हाती कॅच आऊट केलं. नितीशने अप्रतिम झेल घेतला. इफ्तिखार आऊट झाल्यानंतर शादाब खान मैदानात आला.
आता पाकिस्तानला विजयासाठी 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज होती. सौरभने पुन्हा वाई बॉल टाकला. त्यामुळे आता पाकिस्तानला 3 बॉलमध्ये 13 धावा हव्या होत्या. चौथ्या बॉलवर पाकिस्तानकडून चौकार लगावण्यात आला. अंपायरने एलबी+4 इशारा केला. त्यामुळे आता 2 बॉलमध्ये 9 धावा हव्या होत्या. सौरभने पाचव्या बॉलवर 2 धावा दिल्या. त्यामुळे आता पाकिस्तानला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 7 धावांची गरज होती. मात्र सौरभने हुशारीने शेवटचा बॉल टाकला आणि फक्त 1 धावच दिली. यूएसएने अशाप्रकारे सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवला आणि इतिहास रचला. सौरभने शानदार पद्धतीने 19 धावांच्या बचाव केला. सौरभने 13 धावा देत 1 विकेट घेतली.
त्याआधी यूएसच्या ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंह या जोडीने सुपर ओव्हरमध्ये 18 धावा केल्या. पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद आमिर याने सुपर ओव्हरमध्ये तब्बल 9 बॉल टाकले. आमिरने एकूण 9 बॉलमध्ये अनुक्रमे 4, 2, 1, 1+WD, 1, 1+WD, 2, 2+WD आणि 1+W अशा धावा लुटवल्या.
यूएसएचा सुपर ओव्हरमध्ये धमाकेदार विजय
WHAT. A. FINISH!!!! 🤩🤩#TeamUSA wins their second match of the @ICC @T20WorldCup against Pakistan by 5 runs! 🔥#T20WorldCup | #USAvPK | #WeAreUSACricket 🇺🇸 pic.twitter.com/hYuDW0zvTj
— USA Cricket (@usacricket) June 6, 2024
त्याआधी पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना यूएसएला शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा हव्या होत्या. सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. सामना अखेरच्या बॉलपर्यंत पोहचला. यूएसएला विजयासाठी 5 धावांची गरज असल्याने सिक्सशिवाय पर्याय नव्हता. मात्र नितीश कुमारने चौकार ठोकल्याने सामना स्कोअर बरोबर झाला. पाकिस्तान आणि यूएसए दोन्ही संघांना 20 ओव्हरमध्ये 160 धावाच करता आल्या.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.