
India vs New Zealand, Final: आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडचा संघ कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आता आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लढत होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण न्यूझीलंड संघाने कायम टीम इंडियाचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे धाकधूक असणं सहाजिकच आहे. गेल्या काही वर्षांपासून या सामन्याबाबत गैरसमज प्रचलित झाले आहेत. आता टीम इंडियाकडे एक चांगली संधी चालून आली आहे. भारतीय संघ एका विजयासह पाच गैरसमज दूर करू शकतो. पण आता प्रश्न असा आहे की हे पाच गैरसमज आहेत तरी काय? टी20 वर्ल्डकप आणि न्यूझीलंडच्या सामन्याच्या आकडेवारीशी संबंध काय? भारतीय संघाची सध्याची ताकद पाहता न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढू शकते. चला जाणून घेऊयात एक एक करून..
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं हे दहावं पर्व आहे. आतापर्यंत नऊ पर्व झाली असून कोणत्याही गतविजेत्या संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे दहाव्या पर्वात इतिहास बदलण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. भारताने 2024 टी20 वर्ल्डकपचं जेतेपद मिळवलं होतं. आता 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं तर हा गैरसमज दूर होईल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आणखी एक गैरसमज प्रचलित आहे. यजमानपद असलेला संघ कधीही जेतेपदाची चव चाखू शकलेला नाही. 2026 स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे आणि अंतिम फेरीही गाठली आहे. आता न्यूझीलंडला पराभूत करताच हा गैरसमज दूर होईल.
तिसरा सर्वात मोठा गैरसमज असा आहे की, अहमदाबादमध्ये भारताने आयसीसी चषक जिंकलेला नाही. या मैदानात एकमेव आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. आता टीम इंडियाने हा सामना जिंकला तर हा गैरसमज दूर होईल
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड हे संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. तिन्ही वेळेस न्यूझीलंडने भारताला धोबीपछाड दिलेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात हा गैरसमज दूर करण्याची संधी आहे. यासाठी भारताने न्यूझीलंडला धोबीपछाड देणं आवश्यक आहे.
आता पाचवा गैरसमज हा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीशी निगडीत आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ आयसीसी स्पर्धेतील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत आमनेसामने आले आहे. दोन्ही स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ वरचढ ठरला आहे. 2000 साली न्यूझीलंडने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. तर 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत असं घडलं.