AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC, IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे युद्ध नव्हे शांती प्रस्थापित व्हावी, युएईतल्या चाहत्यांना केवळ मनोरंजन आणि खेळ हवा

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीला अजून बराच वेळ आहे, पण रविवारच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा रोमांच अंतिम सामन्यापेक्षा अधिक आहे. हा सामना या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना असणार आहे.

T20 WC, IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे युद्ध नव्हे शांती प्रस्थापित व्हावी, युएईतल्या चाहत्यांना केवळ मनोरंजन आणि खेळ हवा
India vs Pakistan
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 24, 2021 | 7:09 PM
Share

दुबई : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीला अजून बराच वेळ आहे, पण रविवारच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा रोमांच अंतिम सामन्यापेक्षा अधिक आहे. हा सामना या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना असणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मैदानावर खेळाडू विजयासाठी लढतील तर सोशल मीडियावरील चाहते त्यांच्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. भारतातील अनेक चाहते या सामन्याला युद्धाचे नाव देत आहेत, तर काहींना हा खेळ शांततेचे प्रतीक आहे असे वाटते. (T20 World Cup Fans wants peace from India vs Pakistan match)

भारतात अनेक ठिकाणी या सामन्याला विरोध होत आहे. पाकिस्तान भारतविरोधीत दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नये. मात्र, बीसीसीआयने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संघ किंवा बीसीसीआय या बाबतीत मागे हटू शकत नाही. यादरम्यान, दुबईमध्ये राहणारे दोन्ही देशांचे नागरिक या हाय व्होल्टेज सामन्याच्या बहाण्याने शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.

चाहत्यांना शांततेची आशा

यूएईमध्ये राहणारे पाकिस्तानी नागरिक मोहम्मद अशरफ यांनी एएफपीसोबतच्या संभाषणात सांगितले की, ‘आपण एकत्र अधिक क्रिकेट खेळले पाहिजे. या दोन संघांना क्रिकेटच्या मैदानावर पाहून खूप आनंद होतो. राजकारण यापासून दूर ठेवले पाहिजे आणि राजकारण्यांना त्याचा लाभ घेण्याची संधी देऊ नये. खेळाडूंना फक्त क्रिकेट खेळू दिले पाहिजे. मी दोन्ही देशांमध्‍ये शांततेसाठी प्रार्थना करतो.” अबुधाबीमध्‍ये काम करत असलेली भारताची पंखुरी म्हणाली, ‘मॅचची तिकिटे ऑनलाइन येताच मी तिकिटे खरेदी केली. मी अशा संधींची वाट पाहात होते. मला माहित आहे की दोन देशांमध्‍ये परस्थिती फारशी बरी नाही, मात्र ती परिस्थिती सुधारण्याचे काम सरकारचे आहे. मी माझ्या पतीसोबत या सामन्याचा आनंद घेणार आहे.

पाकिस्तान संघाने आजपर्यंत भारताविरुद्ध कधीही विश्वचषकातील सामना जिंकलेला नाही. यावेळी बाबर आझम ही परिस्थिती बदलेल, अशी आशा पाकिस्तानच्या चाहत्यांना आहे. दुबईत टॅक्सी चालवणारे पाकिस्तानचे चाहते हसन शेख म्हणतात, ‘इन्शाअल्लाह आम्ही जिंकू. हा एक नवीन दिवस आहे आणि रेकॉर्ड बनवण्याची संधी पाकिस्तानी संघाकडे आहे. आमच्याकडे चांगली टीम आहे आणि बाबर आमचा कर्णधार आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली हे भारतासाठी धोकादायक ठरतील.

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबल्याला अवघे काही तास शिल्लक

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

(T20 World Cup Fans wants peace from India vs Pakistan match)

Follow Us
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...