AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप जिंकण्यासाठी CSK कडून श्रीलंकेला मदत, कॅप्टन शनाकानेच उघड केलं सिक्रेट

श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. मॅचनंतर श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने सांगितलेल्या काही गोष्टी चाहत्यांना फार आवडल्या.

आशिया कप जिंकण्यासाठी CSK कडून श्रीलंकेला मदत, कॅप्टन शनाकानेच उघड केलं सिक्रेट
आशिया चषक 2022 चे जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंका टीमवर पैशांचा पाऊसImage Credit source: twitter
| Updated on: Sep 12, 2022 | 6:18 PM
Share

मुंबई: श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. मॅचनंतर श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने सांगितलेल्या काही गोष्टी चाहत्यांना फार आवडल्या. चेन्नई सुपरकिंग्सकडून आम्ही विजयी मंत्र घेतला, असं दासुन शनाकाने सांगितलं. “सीएसकेकडून मी टॉसची प्रेरणा घेतली. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा विजय डोक्यात ठेऊन आम्ही मैदानात उतरलो” असं शनाका म्हणाला.

सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं

“पहिल्या पराभवानंतर आम्ही चर्चा केली. आमच्याकडे प्रतिभा आहे, हे आम्हाला ठाऊक होतं. सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. आमच्या क्रिकेटर्सवर विश्वास ठेवा. क्रिकेटर म्हणून जीवनाचा आनंद घेतला पाहिजे” असं शनाका म्हणाला.

टीम चांगलं क्रिकेट खेळत होती

“दोन-तीन वर्षांपूर्वी टीम चांगलं क्रिकेट खेळत होती. पण विजय मिळत नव्हता. हा आमच्या क्रिकेटमध्ये बदल असू शकतो. हे खेळाडू पुढची पाच-सहा वर्ष क्रिकेट खेळणं सुरु ठेवतील, हे चांगले संकेत आहेत” असं शनाका म्हणाला. “वर्ल्ड कप क्वालिफायरमधूनही मदत मिळेल. कारण मुख्य स्पर्धेआधी आम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे. वास्तवात आमच्यासाठीही चांगली संधी आहे” असं श्रीलंकेच्या कॅप्टनने सांगितलं.

हीच टीम भविष्यात मोठं यश मिळवू शकते

हीच टीम भविष्यात मोठं यश मिळवू शकते, असं शनाका म्हणाला. “भारत-पाकिस्तानचा विषय येतो, तेव्हा तो एक वेगळा खेळ असतो. आमचा क्रिकेट इतिहास चांगला आहे. त्यामुळे आमची टीम चांगली आहे, हे आम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही” असं शनाका म्हणाला.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.