T20 World Cup : आयसीसीचा प्लान फसला! भारत आयर्लंड सामन्यातच सर्वकाही झालं उघड
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धा होत आहे. बेसबॉलप्रेमी असेलल्या देशात क्रिकेट रुजवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आयसीसीचा हा प्लान फसताना दिसत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा प्रवास आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये खास स्टेडियम तयार करण्यात आलं आहे. अवघ्या काही महिन्यांमध्ये हे स्टेडियम उभं करण्यात आलं आहे. या मैदानावर काही सामने होणार आहे. पण इतकं करूनही आयसीसीचा प्लान फसताना दिसत आहे. कारण या सामन्यांसाठी हवी तशी प्रेक्षक संख्या मैदानात दिसत नाही. निम्म्यापेक्षा जास्त मैदान रिकामी दिसत असल्याने अमेरिकेतील नागरिकांनी क्रिकेटकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. भारत आयर्लंड सामन्यात अशी स्थिती पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे, भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री झाली नसल्याने मैदानात प्रेक्षक संख्या कमी होईल की काय अशी भीती सतावत आहे. भारत पाकिस्तान सामना याच मैदानावर 9 जूनला होणार आहे. त्यानंतर अमेरिकेसोबत 15 जूनला लढत होणार आहे.
भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना असताना अजूनही तिकीट विक्री न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.भारत पाकिस्तान सामना असला की तिकीट मिळण्यासाठी मारामारी होते. मात्र यावेळचं चित्र काही वेगळंच पाहायला मिळालं आहे. तिकीट विक्री न झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तिकीटाचे दरही परवडणारे नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. चाहत्यांना एका तिकिटासाठी 8.34 लाख रुपये मोजावे लागतील. प्रीमियम क्लब लाउंजच्या तिकिटाची रक्कम ही 2 लाख रुपये, कॉर्नर क्लबची तिकिटाची किंमत जवळपास तितकीच रक्कम आहे.
दोन्ही संघांची एकूण खेळाडू
भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराटकोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.
पाकिस्तान टीम: बाबर आजम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सैम अयूब, शादाब खान, शाहीन शाह आफरीदी आणि उस्मान खान.
