हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात 36 चा आकडा? एकेकाळी आदर्श होता, पण आता…

Irfan Pathan- Hardik Pandya: हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात काही तरी बिनसल्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. हार्दिक पांड्या एक काळ असा होता की इरफान पठाणला आदर्श मानायचा. पण मागच्या 11 वर्षात असं काय घडलं की हार्दिकचा आदर्श आता दुसरं कोणी झालं.

हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात 36 चा आकडा? एकेकाळी आदर्श होता, पण आता...
हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात 36 चा आकडा? एकेकाळी आदर्श होता, पण आता...
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 17, 2026 | 4:54 PM

भारतीय क्रिकेटचा स्टार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. त्यामुळे हार्दिक पांड्याचा विषय आला की काहीतरी नक्कीच घडलं असणार अशी चर्चा रंगते. बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात हार्दिक पांड्याने वसीम जाफर आदर्श असल्याचं सांगितलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण एक वेळ अशी होती की हार्दिक पांड्या इरफान पठाणची अष्टपैलू कामगिरी डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटचे धडे गिरवत होता. त्याला आदर्श मानत होता. हार्दिक पांड्याने 2015 मध्ये क्रिकट्रॅकरला एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने इरफान पठाणला आपला आदर्श असल्याचं म्हंटलं होतं.

युवा क्रिकेटपटू म्हणून कोणाला आदर्श मानतो? असा प्रश्न हार्दिक पांड्याला विचारला होता. तेव्हा हार्दिक पांड्याने इरफान पठाणचं नाव घेतलं. इतकंच काय तर त्याची स्तुती करताना सांगितलं की, इरफान पठाण गोलंदाजीसह फलंदाजी आणि इतर सर्वकाही करतो. तो एक योग्य अष्टपैलू आहे. मी त्याला लहानपणापासून फॉलो करतो. त्याच्या सारखाच मी देखील अष्टपैलू खेळाडू आहे. बडोदासाठी खेळताना मी त्याच्याकडून बरंच काही शिकलो आहे. पण 11 वर्षानंतर पुन्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याचा आदर्श कोणी वेगळंच होतं. यावेळी त्यावेळी त्याने इरफान पठाण ऐवजी वसीम जाफरचं नाव घेतलं.

…म्हणून इरफान पठाणचं नाव घेतलं नाही का?

हार्दिक पांड्याने इरफान पठाणचं नाव न घेतल्याने चर्चा तर होणारच ना.. या दोघांमध्ये काही बिनसलं आहे का? इरफान पठाणने आयपीएल 2025 ब्रॉडकास्ट टीममधून काढल्याप्रकरणी अप्रत्यक्षरित्या हार्दिक पांड्याकडे बोट दाखवलं होतं. त्याच्या तक्रारीनंतरच ब्रॉडकास्ट टीममधून काढल्याचं त्याचं अप्रत्यक्षरित्या म्हणणं होतं. भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंची निंदा केल्याप्रकरणी इरफानला डावललं गेल्याची तेव्हा चर्चा रंगली होती. हाच संदर्भ पकडून इरफानने आपलं मत व्यक्त केलं होतं.

इतकंच काय तर 2021 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दीपक हुड्डाने पांड्या भावंडांवर दादागिरी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. तेव्हा त्याला बडोदा संघ सोडावा लागला होता. बडोदा क्रिकेट असोसिएशनने दीपक हुड्डाला सस्पेंड केलं होतं. त्यानंतर पठाण भावंडांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. इतकंच काय तर इरफान पठाणने अनेकदा हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. त्यामुळेच आता हार्दिक पांड्याचा आदर्श बदलला असावा अशी चर्चा रंगली आहे.

Follow Us