IPL 2022: आता VIVO नाही, टाटा IPL, आज आयपीएल संदर्भात झाला एक महत्त्वाचा निर्णय

आज IPL च्या गर्व्हनिंग काऊन्सिलची बैठक झाली. त्याता हा निर्णय घेण्यात आला. ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली.

IPL 2022: आता VIVO नाही, टाटा IPL, आज आयपीएल संदर्भात झाला एक महत्त्वाचा निर्णय
आयपीएल 2022

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) टायटल स्पॉन्सरशिपमध्ये बदल झाला आहे. आता चिनी मोबाइल उत्पादक कंपनी Vivo ऐवजी टाटा समूह IPL चा टायटल स्पॉन्सर असणार आहे. आज IPL च्या गर्व्हनिंग काऊन्सिलची बैठक झाली. त्याता हा निर्णय घेण्यात आला. ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. “टायटल स्पॉन्सर म्हणून टाटा समूह (TATA Grp) आयपीएलमध्ये प्रवेश करत आहे” असे आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

Vivo ने 2018 साली वर्षाला 440 कोटी रुपयांचा पाच वर्षांसाठी करार केला होता. 2022 मध्ये हा करार संपणार होता. सीमेवरील तणावामुळे विवोने 2020 मध्ये करार स्थगित केला होता. पण त्यानंतर चिनी मोबाइल उत्पादक कंपनीने कराराचा आदर करत 2021, 2022 आणि 2023 पर्यंत स्पॉस्नरशिप देण्याचे आश्वासन दिले होते. 2020 मध्ये ड्रीम 11 ने टायटल स्पॉन्सरशिपची जबाबदारी उचलली. 2021 मध्ये पुन्हा विवो टायटल स्पॉन्सर होता.

2023 च्या मोसमापर्यंत VIVO च्या जागी टाटा समूह आयपीएलचा टायटल स्पॉन्सर असणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात एकूण 10 टीम्स असणार आहेत. यात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ आहेत. IPLआता विवो आयपीएल नाही, तर टाटा आयपीएल म्हणून ओळखली जाईल.

(Tata Group to replace Vivo as IPL title sponsors from 2022)

Published On - 4:23 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI