AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडी

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण हा दौरा वाटतो तितका सोपा नाही. कारण भारतीय संघाची मागच्या कसोटीतील कामगिरी पाहता शंका आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाने खास सराव केला.

IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडी
IND vs SL : गुडघ्यावर बसून टीम इंडिया विजय मिळवणार? सरावात गॉल कसोटीचा प्लान रेडीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 10, 2026 | 7:22 PM
Share

भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. दोन्ही बाजूने प्लान आखले जात आहेत. त्यामुळे कोणता संघ वरचढ ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. श्रीलंकेत कसोटी मालिकेत विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. या मालिकेत विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. यासाठी टीम इंडियाने रणनिती आखली आहे. सराव सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा सरावाला लागली आहे. 10 ऑगस्टला भारतीय संघाने मैदानात घाम गाळला आणि श्रीलंकेविरुद्धच्या रणनितीचा सराव केला. गॉलसाठी रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा कोलंबोत शेवटचं सराव शिबिर होतं. त्यामुळे भारतीय संघाला जो काही सराव करायचा होता तो या ठिकाणी केला. या सरावात भारताने खास करून फलंदाजीचे डाव टाकले.

स्वीप शॉट्सचा सराव, कारण की…

श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकीला मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे फिरकीचा सामना करण्यास तयार असणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय संघाने 10 ऑगस्टला सर्व फिरकी गोलंदाजांचा सामना केला. तसेच एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत होता. या सरावात भारताने फिरकीचा सामना करण्यासाठी स्वीप शॉट अस्त्र काढलं आहे. रेवस्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाने मधल्या खेळपट्टीवर सामन्याचा सराव केला. फलंदाजांनी सामन्यासारखी स्थिती निर्माण करून आपल्या फलंदाजीच्या क्रमानुसार विविध प्रसंग तयार करून सराव केला. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने 45 मिनिटं सराव केला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुबमन गिल गोलंदाजांचा सामना करण्यासाठी उतरले.

शुबमन गिलने केला जुन्या चेंडूचा सामना

श्रीलंकेच्या फिरकीचा अंदाज घेऊन भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार आणि सारांश जैन यांनी फिरकी गोलंदाजी केली. या गोलंदाजीचा सामना भारतीय फलंदाजांनी केला. प्रत्येक फलंदाजाने फिरकी गोलंदाजीविरुद्ध स्वीप आणि रिव्हर्स स्वीप फटके मारण्याचा सराव केला. तर य़ष्टीरक्षक ऋषभ पंतने फिरकी गोलंदाजीला आक्रमकपणे सामोरं जाऊन उंच फटकेबाजी केली. इतकंच काय तर श्रीलंकेतील रिव्हर्स स्विंगचा अंदाज घेऊनही सराव करण्यात आले. कर्णधार शुबमन गिलने रिव्हर्स स्विंगचा सामना करण्यासाठी एका थ्रोडाउन तज्ज्ञासमोर जुन्या चेंडूने सराव केला.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप