World Cup 2023 | टीम इंडियाला मोठा झटका, सरावादरम्यान या बॅट्समनला दुखापत

Indian Cricket Team | टीम इंडियाच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर फलंदाजाला दुखापत झाली आहे. कोण आहे तो?

World Cup 2023 | टीम इंडियाला मोठा झटका, सरावादरम्यान या बॅट्समनला दुखापत
| Updated on: Nov 08, 2023 | 8:49 PM

मुंबई | भारतीय क्रिकेट संघांने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 8 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने सातवा सामना जिंकून वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं. टीम इंडियाने या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या 8 संघांवर मात केली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरचा आणि एकूण नववा सामना हा रविवारी 12 नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचे खेळाडू नेट्समध्ये जोरदार सराव करत आहेत. या सरावादरम्यान टीम इंडियाच्या एका स्टार फलंदाजाला दुखापत झाली आहे. जसप्रीत बुमराह याच्याकडून सरावादरम्यान एका सहकारी खेळाडूला दुखापत झाली. हा खेळाडू सराव करत असताना बुमराहने टाकलेला शॉर्ट पिच बॉल मारण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला.

टीम इंडियाने नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्याआधी बुधवारी 8 नोव्हेंबरला पर्यायी सराव सत्रात सहभाग घेतला. बुमराहने या सरावात चांगलीच बॉलिंग केली. बुमराहने आपल्या फलंदाजांसमोर बॉलिंग टाकून सराव केला. या दरम्यान टीम इंडियाचा युवा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याला दुखापत झाली. ईशानच्या पोटावर बॉल लागला. त्यामुळे ईशान जमीनवर पडला. मिळालेल्या माहितीनुसार, ईशानला झालेली दुखापत ही गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.