AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : विराट कोहली 13 वर्षांनंतर करणार हे काम;ऋषभ पंतला मोठा झटका!

Virat Kohli-Rishabh Pant : टीम इंडियाचे अनुभवी आणि स्टार खेळाडू विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या नक्की काय घडलंय?

Cricket : विराट कोहली 13 वर्षांनंतर करणार हे काम;ऋषभ पंतला मोठा झटका!
virat kohli and rishabh pantImage Credit source: Paul Kane/Getty Images
| Updated on: Jan 17, 2025 | 3:34 PM
Share

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर बीसीसीआय एकदम कठोर झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणाऱ्या अनेक सुविधांवर निर्बंध लावले आहेत. त्यानुसार खेळाडूंना दौऱ्यावर त्यांच्या पत्नीला आणि कुटुंबियांना फार दिवस ठेवता येणार नाही. तसेच कूक, हेयर स्टायलिश यांनाही सोबत नेता येणार नाही. त्यामुळे खेळाडूंसाठी हा मोठा धक्का आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत 1-3 अशा फरकाने पराभव झाला. त्यानंतर बीसीसीआयने हे कठोर निर्णय घेतले आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे स्टार कलचर नियंत्रणात येईल, असं म्हटलं जात आहे. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर अपवादा‍त्मक स्थिती वगळता सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची ताकीदच देण्यात आली आहे. टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ही एकदिवसीय मालिका फार महत्त्वाची आहे. त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तसेच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात होत आहे. अशात मोठी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रणजी ट्रॉफीसाठी डीडीसीएने दिल्ली क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. या संघात तब्बल 13 वर्षांनंतर विराट कोहली याचं पुनरागमन झालं आहे. तसेच विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचीही निवड करण्यात आली आहे. पंत या स्पर्धेत 8 वर्षांनी खेळताना दिसणार आहे. मात्र हे दोघे अनुभवी खेळाडू संघात असूनही त्यांच्यापेक्षा युवा खेळाडूला कर्णधारपद देण्यात आलं आहे. पंतला कर्णधारपद मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र युवा आयुष बदोनी याला कर्णधारपदाची धुरा देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विराट आणि पंतला आयुषच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

विराटच्या खेळण्याबाबत अनिश्चितता

मिळालेल्या माहितीनुसार, विराटचा संघात समावेश करण्यात आलेला आहे. मात्र विराटच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. दिल्लीचा सामना सौराष्ट्र विरुद्ध होणार आहे. विराट या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. विराटला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात मानेचा त्रास जाणवला होता. विराटचा हा त्रास अजून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यासाठी विराटवर आवश्यक उपचार करण्यात आले. त्यामुळे विराट या त्रासातून बरा झाला तर सौराष्ट्र विरुद्ध खेळू शकतो. तर दुसऱ्या बाजूला पंत खेळणार असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे.

बीसीसीआयने डोळे वटारल्यानतंर विराट-पंतचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक

विराट आणि पंतची रणजी ट्रॉफीतील कामगिरी

ऋषभ पंत याने रणजी ट्रॉफीतील 17 सामन्यांमध्ये 58.12 च्या सरासरीने 58.12 च्या सरासरीने 1 हजार 395 धावा केल्या आहेत. पंतची 308 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पंतने या दरम्यान 4 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच विराट कोहली याने 23 सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1 हजार 574 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 शतकं केली आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....