Sanju Samson : बुमराहपेक्षा संजूच भारी, समॅसनने जिंकला आयसीसीचा मोठा पुरस्कार

Sanju Samson Indian Cricket Team : आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संजू सॅमसनचा मोठा सन्मान केला आहे. आयसीसीने 2 खेळाडूंपेक्षा संजूला सरस असल्याचं जाहीर केलंय. संजूने यासह मोठा पुरस्कार जिंकला आहे.

Sanju Samson : बुमराहपेक्षा संजूच भारी, समॅसनने जिंकला आयसीसीचा मोठा पुरस्कार
Sanju Samson Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 14, 2026 | 4:10 PM

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. संजूने भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. संजूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात बॅटिंग आणि विकेटकीपिंगने बहुमूल्य योगदान दिलं होतं. संजूच्या या कामगिरीची आयसीसीने दखल घेतली आहे. आयसीसीने मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटरचं नाव जाहीर केलं आहे. त्यानुसार संजू सॅमसन हा आयसीसीच्या मार्च महिन्यातील पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

आयसीसीने मार्च महिन्यातील पुरस्कारासाठी संजूसह एकूण तिघांना नामांकन दिलं होतं. या तिघांमध्ये संजूसह टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेच्या कोनॉर ईस्टरह्युजेन समावेश होता. मात्र पुरस्कारासाठी संजू आणि बुमराह या दोघांमध्ये कडवी झुंज होती. अखेर संजूने बुमहारला मागे टाकत आपला ठसा उमटवला आणि आयसीसीचा पुरस्कार आपल्या नावावर केला. आयसीसीकडून दर महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंना पुरस्कारासाठी नामांकन दिलं जातं. त्यानंतर आयसीसी आकडेवारीच्या आणि क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या मतांच्या आधारावर पुरस्कार विजेता खेळाडू जाहीर करते.

संजू सॅमसनची पहिली प्रतिक्रिया

संजूने त्याला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. “मी माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणीय टप्प्यावर असताना आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणं ही माझ्यासाठी छान भावना आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या विजयात योगदान देणं हे स्वप्न खरं होण्यासारखं होतं. तसेच त्या क्षणाचं महत्त्व पूर्णपणे समजण्यासाठी मला थोडा वेळ लागला”, अशी प्रतिक्रिया संजू सॅमसन याने  हा पुरस्कार जिंकल्यानंतर दिली.

संजूची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी

संजूची निवड झाल्यानंतरही त्याला वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. मात्र अभिषेक शर्मा सलग 3 वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. त्यानंतर संजूने जे केलं ते साऱ्या क्रिकेट विश्वाने पाहिलं.

संजू समॅसन आयसीसीच्या पुरस्काराचा मानकरी

संजूने 5 सामन्यांमध्ये जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने आणि 80.25 च्या सरासरीने 321 धावा केल्या. तसेच संजूने फक्त मार्च महिन्यातील 3 डावांत 137.50 स्ट्राईक रेटने आणि 199.27 च्या स्ट्राईक रेटने 275 धावा केल्या.

Follow Us