AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : जसप्रीत बुमराह-संजू सॅमसनमध्ये टफ फाईट, आता Icc फैसला करणार, कोण ठरणार सरस?

Jasprit Bumrah vs Sanju Samson : जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन भारताच्या या 2 प्रमुख, अनुभवी आणि मॅचविनर खेळाडूंमध्ये एका पुरस्कारासाठी जोरदार चुरस आहे. या दोघांपैकी कोण विजेता ठरणार हे आयसीसी ठरवणार आहे.

Cricket : जसप्रीत बुमराह-संजू सॅमसनमध्ये टफ फाईट, आता Icc फैसला करणार, कोण ठरणार सरस?
Jasprit Bumrah and Sanju Samson Icc Award.jpgImage Credit source: PTI
| Updated on: Apr 06, 2026 | 5:40 PM
Share

भारतात सध्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. त्याआधी यजमान टीम इंडियाने भारतात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करुन टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. भारत यासह सलग दुसऱ्यांदा आणि सर्वाधिक तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा संघ ठरला. भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने प्रमुख भूमिका बजावली. तर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यानेही चाबूक कामगिरी केली. त्यामुळे आयसीसीने भारताच्या दोघांना मार्च महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी नामांकन दिलं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या कोनॉर ईस्टरह्यूजेन या पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा तिसरा खेळाडू आहे.

आयसीसी दर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्काराने (Icc Player Of The Month Award) सन्मानित करते. आयसीसी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूमंधून तिघांची निवड करुन त्यांना नामांकन जाहीर करते. चाहत्यांना नामांकन प्राप्त 3 खेळाडूंपैकी आपल्या आवडत्या खेळाडूला मत देता येतं. त्यानंतर आयसीसी त्या खेळाडूला मिळालेली मतं आणि तिघांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूची आकडेवारी पाहून पुरस्कार विजेत्याचं नाव जाहीर करते.

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने 8 सामन्यांमध्ये एकूण 14 विकेट्स मिळवल्या. तसेच बुमराहची या स्पर्धेत 15 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. बुमराहने अंतिम सामन्यात या 4 विकेट्स मिळवल्या होत्या. बुमराहला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

संजू सॅमसन

संजू सॅमसन टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत ठार अपयशी ठरला. त्यामुळे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत संजूचा प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट करण्यात आला. मात्र अभिषेक शर्मा सलग 3 वेळा झिरोवर आऊट झाल्याने संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली. संजूने या संधीचं सोनं केलं. संजूने बाद फेरीतील तिन्ही सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या. संजूने या 3 सामन्यांमध्ये एकूण 275 धावा केल्या. संजूला या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारने गौरवण्यात आलं. संजूची ही टी 20i तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम आणि अविस्मरणीय कामगिरी ठरली.

आयसीसीकडून तिघांना नामांकन

कोनॉर ईस्टरह्युजेन

तसेच दक्षिण आफ्रिकेच्या कोनॉर ईस्टरह्युजेन याला न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत केलेल्या कामगिरीसाठी नामांकन मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंजदाजाने किवी विरुद्ध 5 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह एकूण 200 धावा केल्या. कोनॉरचे आकडे संजू-बुमराहपेक्षा कमीच आहेत. त्यामुळे कोनॉर हा पुरस्कार मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आता आयसीसी संजू आणि बुमराहपैकी या पुरस्कारासाठी कुणाची निवड करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...