IND vs AUS: ऑस्ट्रेलियात पोहचताच रोहित-विराटचा मोठा निर्णय, व्हीडिओ व्हायरल

Rohit Sharma and Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहेत. मात्र या दोघांनी ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर काय निर्णय घेतला? जाणून घ्या.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियात पोहचताच रोहित-विराटचा मोठा निर्णय, व्हीडिओ व्हायरल
Virat and Rohit Team India
Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 16, 2025 | 9:06 PM

भारतीय क्रिकेट संघ अवघ्या काही तासांपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघाची बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडिया या दौऱ्यात शुबमन गिल याच्या कॅप्टन्सीत 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. या मालिकेचा थरार 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाच्या या अनुभवी जोडीने ऑस्ट्रेलियात पोहचताच मोठा निर्णय घेतला. एका बाजूला विराट आणि रोहित या दोघांनी वेळ न दवडता सराव केला. तर दुसऱ्या बाजूला सरावाला 10 खेळाडू गैरहजर राहिले. ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर पहिल्या दिवशी टीम इंडियाकडून फक्त 5 खेळाडूंनीच सराव केला. या 5 खेळाडूंमध्ये विराट आणि रोहितचा समावेश होता.

10 खेळाडू गैरहजर का?

आता रोहित आणि विराटसारख्या अनुभवी खेळाडूंनी सराव केला मग या 10 जणांनी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे 10 खेळाडू ऑस्ट्रेलियात उशिराने पोहचले. विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर हे खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीसाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे हे खेळाडू सरावाला गैरहजर राहिल्याचं म्हटलं जात आहे.

विराट पर्थ मैदानात उतरला. विराटने आधी स्ट्रेच केलं. विराटने त्यानंतर सरावाला सुरुवात केली. विराटने या दरम्यान कॅच घेण्याच सराव केला. विराट त्यानंतर नेट्समध्ये सरावासाठी गेला. विराटला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. मात्र त्यानंतर विराटला सूर गवसला. विराटने जवळपास 40 मिनिटं बॅटिंग केली. विराटने या 40 पैकी 20 मिनिटं नेट्समध्ये घालवली. तर उर्वरित 20 मिनिटं थ्रो डाऊनवर बॅटिंग केली.

हिटमॅन रोहितने काय केलं?

रोहित शर्मा याला सुरुवातीला नेट्समध्ये संघर्ष करावा लागला. मात्र त्यानंतर रोहितच्या बॅटवर अचूक बॉल येत होता. रोहितने सरावानंतर हेड कोच गौतम गंभीरसह चर्चा केली. तसेच विराट रोहित व्यतिरिक्त हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि केएल राहुल या त्रिकुटानेही नेट्समध्ये घाम गाळला.

रोहित-विराटचा जोरदार सराव

या खेळाडूंची दांडी

तर टीम इंडियाच्या 10 खेळाडूंनी सरावाऐवजी स्विमिंग पूलमध्ये थोडा वेळ घालवला. या खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि कॅप्टन शुबमन गिल यांचा समावेश होता.