AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : शिखर धवनच्या निवृत्तीनंतर रोहितने तो जुना फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला…

Rohit Sharma Post on Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कायम हसत आपल्या जिगरबाज खेळीने सामने एकट्याच्या दमावर खेचून आणणारा गब्बर आता मैदानात दिसणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने भावनिक पोस्च केली आहे.

Retirement : शिखर धवनच्या निवृत्तीनंतर रोहितने तो जुना फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला...
Rohit Sharma Post on Shikhar Dhawan Retirement
| Updated on: Aug 25, 2024 | 8:42 PM
Share

टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शिखर धवनने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिस्टर आयसीसी म्हणून धवनला म्हटलं जायचं. कारण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बड्या खेळाडूंची भंबेरी उडालेली पाहायला मिळते. पण धवन त्यावेळी विरोधी संघावर एकटाच तुटून पडायचा. गेल्या दोन वर्षांपासून तो टीम इंडियामधून बाहेर होता. अखेर त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने धवनच्या निवृत्तीनंतर खास पोस्ट केली आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवन धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाकडून सलामीला येत होते. अनेक वर्षे दोघांनी ओपनिंग केली आणि टीम इंडियाला आक्रमक आणि मजबूत सलामी दिली. पण काही वर्षांनंतर धवनचं संघातील स्थान गेलं आणि रोहितसोबत ओपनिंगला येणारे खेळाडू बदलत राहिले. पण धवनसोबत खेळतानाच्या आठवणी रोहितच्या मनात कायमस्वरूपी राहिल्या. रोहितने आपल्या जीवाभावाच्या पार्टनरसोबतचे फोटो शेयर करत एक खास पोस्ट केली.

रूम्सपासून मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत. तू नेहमी माझे काम दुसऱ्या बाजूला राहून सोपे केलेस, असं रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच रोहितने दोघांचे सोबतचे काही फोटोही शेअर केलेत. दोघेही युवा खेळाडू म्हणून करियरची पायाभरणी करत होते. दोघांचा तो फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, टीम इंडियाची टॉप ऑर्डर किल्ल्याच्या तटबंदीसारखी होती. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे त्रिमुर्ती म्हणजे विरोधकांसाठी मोठा फास होता. कारण धवन आणि रोहितची भागीदारी झाली तर अर्धा सामना तेच जिंकवत होते. त्यानंतर कोहली येऊन विजयी पताका लावण्याचं काम करत होता.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.