AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | 11 चौकार आणि 2 षटकार, रोहित शर्माचे शतकासह अनेक विक्रम

Rohit Sharma Century | टीम इंडियाची सुरुवात अंत्यत निराशाजनक झाली. झटपट 3 विकेट्स गमावल्याने टीम इंडिया बॅकफुटवर गेली. मात्र कॅप्टन रोहित शर्मा याने टीम इंडियाचा डाव सावरत शतक ठोकलं.

Rohit Sharma | 11 चौकार आणि 2 षटकार, रोहित शर्माचे शतकासह अनेक विक्रम
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 15, 2024 | 3:22 PM
Share

राजकोट | रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी राजकोटमध्ये टीम इंडियाच अडचणीत असताना झुंजार शतक ठोकलं आहे. रोहितने खऱ्या अर्थाने कॅप्टन्सी इनिंग खेळली आहे. टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर रोहितला चांगली साथ देत रवींद्र जडेजा याने चांगली साथ दिली. दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत स्कोअरकार्ड हलता ठेवला. तसेच संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले. अशाप्रकारे दोघांनी शतकी भागीदारीही केली. त्यानंतर टी ब्रेकनंततर रोहितने शतक झळकावलं.

रोहितने 157 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 64.33 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे 11 वं शतक ठरलं. तसेच इंग्लंड विरुद्धचं आणि कॅप्टन म्हणून हे तिसरं शतक होतं. रोहितने या शतकासह इंग्लंडच्या जो रुट याला मागे टाकलं आहे. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा तिसरा सक्रीय फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून आता एकूण 47 शतकांची नोंद झाली आहे. तर जो रुट याच्या नावावर 46 शतकं आहेत. तर विराट कोहली 80 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

रोहितकडून दिग्गजांची बरोबरी

रोहितचं कसोटी कारकीर्दीतील ओपनर म्हणून हे तिसरं शतक ठरलं. रोहितने यासह मुरली विजय, केएल राहुल आणि दिग्गज विजय मर्चेंट यांच्या विक्रमाची बरोबरी केली. सुनील गावसकर यांच्या नावावर टीम इंडियाकडून कसोटी ओपनर म्हणून सर्वाधिक 4 शतकांचा विक्रम आहे.

रोहित शर्मा याची झुंजार शतकी खेळी

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...