Vinod Kambli Wife : Andrea Hewitt कांबळीला घटस्फोट देणार होती, पण.., क्रिकेटरच्या पत्नीचा खुलासा काय?
Vinod Kambli- Andrea Hewitt : विनोद कांबळी गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीमुळे चर्चेत आहे. मात्र त्याची तब्येत काही अंशी सुधारली आहे. या खडतर प्रवासात त्याला त्याची पत्नी एंड्रीया हेविट हीने साथ दिली. मात्र एंड्रीया हीने कांबळीला घटस्फोट देण्याबाबत काय म्हटलं? जाणून घ्या.

टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळी गेल्या काही महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणामुळे चर्चेत आहे. कांबळीची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून स्थिर नव्हती. कांबळीला काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कांबळीने रुग्णालयात सर्व उपचार घेतले आणि ठणठणीत होऊन घरी परतला. कांबळी त्यानंतर वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित होता. कांबळीला या कार्यक्रमाला त्याची दुसरी पत्नी एंड्रीया हेविट हात धरुन घेऊन आली होती. मात्र हीच एंड्रीया कांबळीला घटस्फोट देणार होती, असं स्वत: तिनेच म्हटलं आहे.
एंड्रीया काय म्हणाली?
“मी एकदा विनोद कांबळीपासून वेगळं होण्याचा विचार केला होता. मी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र पुन्हा कांबळीची स्थिती पाहून मी हा निर्णय बदलला. मी त्याला सोडलं तर तो असहाय्य होईल. तो एका लहान मुलासारखा आहे. मला फार दु:ख होतं. मी कधीच मित्राला सोडणार नाही आणि तो त्यापेक्षा जास्त आहे. मला आठवतंय की मी त्याच्यासोबत नसायची तेव्हा त्याने काही खाल्लं की नाही? तो ठीक आहे का? तो अंथरुणात निट आहे का? याबाबत काळजी वाटायची. त्यानंतर त्याचं चेकअप केलं. त्यानंतर मला समजलं की त्याच्यासोबत रहावं लागेल. त्याला माझी गरज आहे” असं एंड्रीयाने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं.
“मला स्वत:ला परिस्थितीची जाणीव करुन घ्यायला लागायची. मीच माझ्या कुटुंबाची आई आहे आणि बाबा. माझा मुलगा ख्रिस्तियानो यानेही सर्व काही समजून घेतलं होतं. ख्रिस्तियानोने मला कधीच त्रास दिला नाही. त्याला परिस्थितीची जाणीव आहे. त्याने माझ्या भावना समजून घेतली”, असंही एंड्रियाने म्हटलं.
कांबळीचा मुलगा ख्रिस्तियानो काय म्हणाला?
“मी फक्त परिस्थिती समजण्याचा प्रयत्न केला. मी आईच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायचो. आई आनंदी रहावी यासाठी प्रयत्न करायचो. मी वडिलांची काळजी घेतो”, असंही ख्रिस्तियानो याने म्हटलं. विनोद कांबळी आणि एंड्रिया हेविट दोघांनी 2006 साली लग्न केलं होतं. या दोघांना ख्रिस्तियानो आणि जोहाना अशी 2 अपत्य आहेत. विशेष म्हणजे ख्रिस्तियानो हा वडिलांप्रमाणेच क्रिकेट खेळतो.
