AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement | शिखर धवन याच्या निवृत्तीबाबत सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य, ओपनर फक्त…

लिटल मास्टर म्हणून ओळखले जाणारे टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी शिखर धवनच्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले आहे. शिखर धवनच्या निवृत्तीवर बोलताना ओपनर्सा संघाबाहेर का केले जातं? हे गावस्करांनी सांगितलं आहे.

Retirement | शिखर धवन याच्या निवृत्तीबाबत सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य, ओपनर फक्त...
| Updated on: Aug 27, 2024 | 4:43 PM
Share

टीम इंडियाचा आक्रमक ओपनर शिखर धवन याने 24 ऑग्स्टला क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या दोन वर्षांपासून तो टीमबाहेर होता. आता टीममध्ये येण्याची त्याची दारेही बंद झाली होतीत. 38 वर्षीय शिखर धवन याने कमबॅक करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पण त्याला परत काही टीममध्ये जागा मिळवता आली नाही. टीम इंडियाच्या गब्बरची वेगळीच स्टाईल हवी. कॅच पकडल्यावर मांडी थोपटायचा, शतक झाल्यावर गडी आपल्या मिशांवर ताव मारायचा. आता गब्बरने मैदान सोडले असले तरी त्याची आठवण प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि लिटल मास्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या सुनील गावसकर यांनी धवनच्या निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिखर धवन याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा खेळ आणखी बहारणार आहे. शिखर हा हसमुख खेळाडू असून तो सकारात्मक दिसतो. शिखरला प्रेमाने गब्बर असंही बोलतात. शिखर हा प्रतिभावान खेळाडू होता. मात्र सलामीच्या फलंदाजांना जशी एखादी सीरीज खराब जाते त्यानंतर थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो. शिखरला दुखापींनीही त्रास दिला. त्यामुळे त्याच्यातील खेळ दाखवण्याची त्याला फार कमी संधी मिळाली. कदाचित या कारणामुळेच त्याने निवृत्त होण्याच निर्णय घेतल्याचं सुनील गावस्कर म्हणाले.

2013 आणि 2019 या वर्षात टीम इंडियाची त्रिमुर्ती असलेल्या रोहित, शिखर आणि विराट यांना अनेक सामने एकहाती जिंकवले होते. तिघांनीही तशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात केली होती. मात्र शिखर धवन हा जास्त काही चर्चेत राहिला नाही. शिखरने निवृत्ती जाहीर करताना एक व्हिडीओमध्ये म्हटलंं की, मी स्वत:ला सांगतो की निवृत्त होत आहे म्हणून दु:खी होण्यापेक्षा भारतासाठी खेळायला मिळालं या गोष्टीने आनंदी असायला हवं. माझ्यासाठी हीच सर्वात मोठी गोष्ट आहे की मी देशासाठी क्रिकेट खेळलो.

दरम्यान, शिखर धवन याने 34 कसोटी, 167 वनडे सामने आणि 68 टी-20 सामने खेळले, यामध्ये त्याने अनुक्रमे 2315 धावा, 6793 धावा आणि 1759 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये 17 शतके 39 अर्धशतके तर कसोटीमध्ये त्याने 7  शतके आणि 5 अर्धशतके केलीत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.