टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून यंदा जेतेपदाचा मानकरी कोण? याची उत्सुकता वाढली. जो तो त्याच्या त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे संघ जाहीर करत आहे. पण या दरम्यान महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियाला धोक्याची घंटा काय आहे ते आधीच सांगून टाकलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 03, 2026 | 11:15 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याला कारणही तसंच आहे. मागच्या वर्ल्डकप विजयानंतर आतापर्यंत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण अति आत्मविश्वास कधी कधी नडतो. त्यामुळे ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. टीम इंडियाच्या सातत्यपूर्ण कामगिरीत खंड पडण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण आघाडीचे फलंदाज फेल गेले तर टीम इंडिया नांगी टाकून देते असंच दिसून आलं आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका कार्यक्रमात संघाची पडकी बाजू मांडली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आतापासून सावध राहणं गरजेचं आहे. महेंद्रसिंहने धोनीने स्पष्टच सांगितलं की आंतरराष्ट्रीय करिअरदरम्यान मैदाना पडणाऱ्या दव पाहून खूप घाबरायचा.

महेंद्र सिंह धोनीने जतिन सप्रू यांच्याशी बोलताना स्पष्ट सांगितलं की, ‘टीम इंडिया खूपच घातक संघ आहे. एक चांगला संघ असण्याचे सर्व गुण संघात आहेत. संघाकडे खूप चांगला अनुभव आहे. त्यांना दबावात खेळण्याचा अनुभव आहे. ज्या खेळाडूला जी भूमिका दिली आहे ती भूमिका त्या खेळाडूंनी योग्य पद्धतीने पार पाडली आहे.’ संघाचं कौतुक करताना महेंद्रसिंह धोनीने आपली चिंताही व्यक्त केली आहे. ‘मलला चिंता आहे ती मैदानात पडणाऱ्या दवाची.. मैदानातील दव सर्व चित्र बदलू शकते. जेव्हा मी खेळायचो तेव्हा मी देखील दव पडलं की घाबरायचो. दव फॅक्टरमध्ये नाणेफेक खूपच महत्त्वाची ठरते. जर परिस्थिती योग्य असेल आणि दव नसेल तर टीम इंडिया 10 पैकी बहुतांश सामने सहज जिंकेल.’

महेंद्रसिंह धोनीने पुढे सांगितलं की, “जर तुमच्या एखाद्या खेळाडूचा दिवस वाईट असेल आणि प्रतिस्पर्ध्याचा दिवस चांगला असेल, असं चित्र टी20 क्रिकेटमध्ये सामान्य आहे. हे साखळी फेरीत किंवा बाद फेरीत घडते. तेव्हा फक्त प्रार्थना कामी येते. कोणताही खेळाडू जखमी होऊ नये आणि खेळाडू त्यांची नेमलेली भूमिका पार पाडावी. जर असे झाले तर टीम इंडिया सर्वात धोकादायक संघांपैकी एक आहे.”