Team India: भारताच्या युवा खेळाडूच दु:ख, बोलला, इतक्या धावा केल्या, पण तरीही लोक चांगलं नाही बोलतं

कोण आहे तो खेळाडू? त्याला असं का वाटतं?

Team India: भारताच्या युवा खेळाडूच दु:ख, बोलला, इतक्या धावा केल्या, पण तरीही लोक चांगलं नाही बोलतं
team india
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 22, 2022 | 2:47 PM

मुंबई: टीम इंडियामध्ये अलीकडच्या काळात अनेक युवा क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली. त्यात काही आपली छाप उमटवण्यात यशस्वी ठरले. काहींना संधी मिळूनही कौशल्य दाखवता आलं नाही. म्हणून ते अपयशी आहेत, असं म्हणता येणार नाही. अशाच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंमध्ये ऋतुराज गायकवाडचा समावेश होतो. ऋतुराज गायकवाड मूळचा पुण्याचा. आयपीएलमध्ये तो एमएसधोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. आयपीएलमध्येच सर्वप्रथम त्याचं कौशल्य दिसून आलं.

टीम इंडियासाठी किती सामने खेळलाय?

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची टॅलेटेड क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. मागच्यावर्षी आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 25 वर्षाचा ऋतुराज टीम इंडियासाठी नऊ सामने खेळलाय. त्याला फक्त टी 20 फॉर्मेटमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

कधी डेब्यु केला?

ऋतुराजने नऊ टी 20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये 135 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. त्याने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये टी 20 डेब्यु केला होता.

यावर्षी आयपीएलमध्ये किती धावा केल्या?

ऋतुराजने आयपीएल 2020 मध्ये डेब्यु केला. त्या सीजनमध्ये तो एकूण सहा सामने खेळला. त्याने एकूण 204 धावा केल्या. 2021 च्या सीजनमध्ये त्याने एक सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरी झळकावल्या. त्याने 635 धावा केल्या. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने एकूण 368 धावा केल्या.

मुख्य लक्ष्य काय?

“मी निकष ठरवलेत. यात चढ-उतार होत राहणार. व्यक्ती, खेळाडू आणि क्रिकेटर म्हणून मी प्रगती करत राहीन. मुख्य लक्ष्य सतत स्वत:मध्ये सुधारणेच आहे” असं ऋतुराज म्हणाला.

ऋतुराज काय म्हणाला?

देशातंर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राकडून खेळतो. “तुम्ही माझा मागचा दोन वर्षांचा रेकॉर्ड पाहिला, तर मी त्यात खूप काही मिळवलय. मी जितक्या धावा केल्यात, त्यावरुन तुम्ही माझं आकलन करु शकत नाही. कारण त्यात चढ-उतार होत असतात. आयपीएमध्ये मी आधी 635 धावा केल्या. त्यानंतरच्या सीजनमध्ये 400 रन्स केल्या. पण तरीही लोक म्हणतात माझ्यासाठी आयपीएल सीजन चांगला नव्हता” असं ऋतुराज म्हणाला.

न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज

ऋतुराजला खेळाडू म्हणून सतत स्वत:मध्ये सुधारणा करायची आहे. गायकवाड भारतीय ‘ए’ टीमचा भाग आहे. गुरुवारपासून चेन्नईच्या स्टेडियमवर न्यूझीलंड ‘ए’ विरुद्ध तीन वनडे सीरीजची सुरुवात होणार आहे. ऋतुराजने न्यूझीलंड ए विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावलं. पुढच्या डावात अवघ्या 6 धावांनी शतकाची संधी हुकली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें