टीम इंडियाच्या सर्वात तरूण हेड कोच यादीत गौतम गंभीरची एन्ट्री, नंबर वन कोण?
टीम इंडियाचा हेड कोच म्हणजे एक मोठी जबाबदारी असून आता गौतम गंभीरकडे ही जबाबदारी आहे. तुम्हाला माहिती का टीम इंडियाचा सर्वात तरूण हेड कोच कोण होते? गंभीरची या यादीमध्ये एन्ट्री झालीये मात्र तरीही तो चौथ्या स्थानी आहे मग नंबर वन कोण आहे? जाणून घ्या.

टीम इंडियाच्या कोचपदी आता गोतम गंभीर याची निवड झाली आहे. टी-20 वर्ल्ड कप झाल्यावर राहुल द्रविड याचा कार्यकाल संपला. त्यानंतर बीसीसीआयने गौतमची वर्णी लावली. गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया आता आगामी आशिया कप, चॅम्पियन ट्रॉफी, टी-20 वर्ल्ड कप 2026 आणि वन डे वर्ल्ड कप 2027 या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. टीम इंडियाचा हेड कोच म्हणजे एक मोठी जबाबदारी असून आता गौतम गंभीर टीमकडून कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गौतम गंभीर हा टीम इंडियाचा चौथा सर्वात तरूण कोच ठरला आहे.
टीम इंडियाच्या सर्वात तरूण कोच या यादीमध्ये गौतम गंभीर हा चौथा झाला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी भारतीय संघाच्या हेडकोचपदी निवड झाली आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि केकेआरचा मेन्टॉर म्हणून काम पाहिलं. केकेआरने मागील वर्षी आयपीएलचं विजेतेपद जिंकलं होतं. तेव्हापासूनच गंभीर नवीन हेड कोच होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर टी-20 वर्ल्ड कप झाल्यावर गौतम गंभीरच्या नावाची बीसीसीआयकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.
या यादीमध्ये तिसऱ्या जागी कपिल देव असून वयाच्या 40 व्या वर्षी हेड कोचपदी निवड झाली होती. 1999 मध्ये कपिल देव यांची हेड कोचपदी निवड झालेली मात्र त्यांच्या काळात टीमला काही विशेष कामगिरी करता आली नाही. यादीत दुसऱ्या स्थानावर संदीप पाटील असून त्यांचीही वयाच्या 40 व्या वर्षी 1996 मध्ये टीम इंडियाच्या हेड कोचपदी निवड झालेली. त्यांचा कार्यकाल फार काळ नव्हता.
या यादीमध्ये सर्वात तरूण आणि एक नंबरचा मान मिळवणारे अशोक मंकड आहेत. दिग्गज फलंदाज विनोद मांकड यांचे ते सुपुत्र होते. 1982 मध्ये वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांची टीम इंडियाच्या हेडकोचपदी निवड झाली होती. मंकड याच्या काळातही टीम इंडियाची कामगिरी काही समाधानकारक झाली नाही. इंग्लंड आणि श्रीलंकेविरूद्धची मालिका गमावली लागली होती.
