AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 मधून डच्चू, Yuzvendra Chahal याची पहिली प्रतिक्रिया

Indian Cricket Team Squad For Asia Cup 2023 | बीसीसीआय निवड समितीने आशिया कपसाठी टीम इंडियात युझवेंद्र चहल याला संधी दिली नाही.

Asia Cup 2023 मधून डच्चू, Yuzvendra Chahal याची पहिली प्रतिक्रिया
टीम इंडियामध्ये निवड न झाल्याने खेळाडूची क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यामध्ये सर्वात आघाडीचं नाव म्हणजे युजवेंद्र चहल. याआधीसुद्धा त्याला टी-20 वर्ल्ड कप 2021 साली संघातून वगळण्यात आलं आहे. चहलला संघात जागा मिळाल्याने चाहते नाराज झाले आहेत.
| Updated on: Aug 21, 2023 | 6:49 PM
Share

मुंबई | आशिया कपसाठी 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियाच्या खेळाडूंची नाव जाहीर करताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा उपस्थित होते. दोघांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. आशिया कपसाठी टीम इंडियासाठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युझवेंद्र चहल याला संधी का देण्यात आली नाही, हा सर्वात मोठा प्रश्न होता. टीम इंडियात फिरकीपटू म्हणून ऑलराउंडर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांना संधी देण्यात आली आहे. टीममध्ये संधी न मिळाल्याने युझवेंद्र चहल याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

युझवेंद्र चहल काय म्हणाला?

युझवेंद्र चहल याने ट्विटरवर इमोजी शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. चहलच्या ट्विटमध्ये एका बाजूला सूर्य हा आभाळामागे लपताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला बाणाने इशारा करत तळपणारा सूर्य दाखवलाय. या ट्विटमधून चहलने पुन्हा एकदा कमबॅक करुन धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचं संकेत दिले आहेत.

कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला?

टीममध्ये युझवेंद्र चहलला संधी का दिली नाही, असा प्रश्न कॅप्टन रोहित शर्मा याला विचारण्यात आला. यावर रोहित शर्मा उत्तर देताना म्हणाला की, “आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे सर्व वर्ल्ड कपचा एक भाग आहेत. आतापर्यंत कुणासाठीच टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. आम्हाला हा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला, कारण टीममध्ये एका वेळेस फक्त 17 जणांनाच संधी देता येणार होती. अक्षर पटेल बॉलिंगसोबत बॅटिंगही करतो. त्याने आतापर्यंत या वर्षी चांगली कामगिरी केली आहे.”

यूझवेंद्र चहल याची सोशलल मीडिया पोस्ट

आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

स्टँडबाय | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.