AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो वादात होता, पण…! टेम्बा बावुमाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर या खेळाडूंना दिलं श्रेय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकत दक्षिण अफ्रिकन संघाने 27 वर्षांचा आयसीसी चषकांची दुष्काळ दूर केला आहे. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकन संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये जेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा याने विजयाचं विश्लेषण करताना दोन खेळाडूंचा उल्लेख केला.

तो वादात होता, पण...! टेम्बा बावुमाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर या खेळाडूंना दिलं श्रेय
टेम्बा बावुमाImage Credit source: video grab/Twitter
| Updated on: Jun 14, 2025 | 8:35 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाच गडी राखून ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 212 धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेला 138 धावांवर रोखलं. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची मजबूत आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळी केली आणि 207 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे हा विजय काय दक्षिण अफ्रिकेला गाठता येणार नाही असंच वाटत होतं. लॉर्ड्सवर 282 धावांचं विजयी लक्ष्य गाठणं काही सोपं नव्हतं. पण दक्षिण अफ्रिकेने पाच गडी गमवून 282 धावा पूर्ण केल्या. या विजयात एडन मार्करम आणि कगिसो रबाडा यांची खेळी महत्त्वाची ठरली. पण सामनावीराचा पुरस्कार एडन मार्करम घेऊन गेला. दक्षिण अफ्रिकेने 27 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. या आधी हँसी क्रोनिएच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 जिंकली होती. या विजयानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने आनंद व्यक्त केला आहे.

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, “गेले काही दिवस आमच्यासाठी खूप खास होते. आम्हाला असे वाटले की आम्ही दक्षिण आफ्रिकेत घरी परतलो आहोत, कारण या सामन्यादरम्यान आम्हाला खूप पाठिंबा मिळाला. एक संघ म्हणून आमच्यासाठी हा एक संस्मरणीय क्षण आहे. ते जाणवण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. कागिसो रबाडा हा एक मोठा खेळाडू आहे, काही वर्षांत तो आयसीसी हॉल ऑफ फेमचा भाग देखील होईल. तो वादात होता, पण त्याने जे केलं ते तो करतो. मार्कराम अविश्वसनीय होता, आकडेवारी महत्त्वाची आहे, परंतु आम्हाला माहित होते की तो काय करू शकतो. मला खात्री आहे की घरी लोक उत्सव साजरा करत असतील.”

पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या कगिसो रबाडाने 5 विकेट घेत कांगारूंना बॅकफूटवर ढकललं होतं. त्याने 15.4 षटकात 51 धावा देत पाच बळी टिपले होते. दुसरीकडे, पहिल्या डावात एडन मार्करम फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसऱ्या डावात कगिसो रबाडाने पुन्हा कमाल केली. 18 षटकात 59 धावा देत 4 गडी बाद केले. दरम्यान दुसऱ्या डावात एडन मार्करची बॅट चांगलीच तळपली. त्याने 207 चेंडूंचा सामना 136 धावा केल्या. यात 14 चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेला विजयाची चव चाखता आली.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.