ऑस्ट्रेलियातील WBBL सामन्यात घडला विचित्र प्रकार, दुसऱ्यांचा सामना रद्द करण्याची वेळ

वुमन्स बिग बॅश लीग 2025 स्पर्धेत दुसऱ्यांदा सामना रद्द करण्याची वेळ आली आहे. पण यावेळी घडलेलं कारण थोडं वेगळं आहे. हा सामना पाऊस किंवा इतर कारणामुळे नाही तर भलत्याच कारणामुळे रद्द करावा लागाला.

ऑस्ट्रेलियातील WBBL सामन्यात घडला विचित्र प्रकार, दुसऱ्यांचा सामना रद्द करण्याची वेळ
ऑस्ट्रेलियातील WBBL सामन्यात घडला विचित्र प्रकार, दुसऱ्यांचा सामना रद्द करण्याची वेळ
Image Credit source: Getty Images & Fox Cricket
| Updated on: Dec 05, 2025 | 10:11 PM

वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत या पर्वात दुसऱ्यांदा सामना रद्द करण्यात आला आहे. पहिल्यांदा पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे सामना रद्द केला गेला. पण त्यातही एका षटकाचा सामना शिल्लक असताना सामना रद्द केल्याने गोंधळ उडाला. क्रीडाप्रेमींनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. पण दुसऱ्यांदा सामना रद्द करण्याचा प्रकार वेगळा होता. सामना हा प्रेक्षकांच्या हुल्लडबाजी किंवा पावसामुळे नाही तर विचित्र कारणामुळे रद्द केला. यापूर्वी अशा पद्धतीने सामना रद्द करण्याची वेळ कधीच आली नसावी. वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत होबार्ट हरिकेंस आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान चेंडू खेळपट्टीत घुसला आणि खड़्डा पडला. त्यामुळे असं काही विचित्र झाल्याने गोंधळाचं वातावरण झालं. अशा खेळपट्टीवर पुन्हा खेळवणं कठीण होतं. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. नेमकं काय घडलं ते पुढे जाणून घ्या.

5 डिसेंबर 2025 रोजी वुमन्स बिग बॅश लीगचा 37वा सामना सुरु होता. या सामन्यात यजमान एडिलेडने प्रथम फलंदाजी घेतली होती. 20 षटकात 4 गडी गमवून 167 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. दुसरा डावाचा खेळ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटांचा ब्रेक होता. या दरम्यान ग्राउंड स्टाफ खेळपट्टीची दुरूस्ती करत होते. तसेच खेळपट्टीवर रोलर चालवला जात होता. असं करत असताना विचित्र प्रकार घडला. काही खेळाडू मैदानाजवळ सराव करत होते. तेव्हा एक चेंडू खेळपट्टीजवळ गेला आणि नको तेच घडलं.

चेंडू रोलरच्या खाली आला आणि त्यावर रोलर फिरला. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर दाबला गेला आणि खड्डा पडला. त्यानंतर जेव्हा खेळपट्टी पाहीली तर ग्राउंड स्टाफला घाम फुटला. कारण ही खेळपट्टी रिपेअर करणं कठीण होतं. त्यामुळे खेळपट्टी दुरूस्तीसाठी पावलं उचललं गेली. पण खेळपट्टी काही दुरूस्त झाली नाही. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही विजयासाठी 3 धावांची गरज असताना सामना रद्द केला होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.