AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WBBL 2025 : विजयासाठी 13 चेंडूत 3 धावांची गरज असताना पंचांनी सामना केला रद्द, कारण की…

वुमन्स बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेतील एका सामन्यात विचित्र प्रकार घडला. एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर सामना थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. 3 धावांची गरज असताना सामना थांबल्याने चर्चाना उधाण आलं आहे. नेमकं काय घडलं आणि पंचांनी असा निर्णय का घेतला? ते जाणून घेऊयात

WBBL 2025 : विजयासाठी 13 चेंडूत 3 धावांची गरज असताना पंचांनी सामना केला रद्द, कारण की...
WBBL 2025 : विजयासाठी 13 चेंडूत 3 धावांची गरज असताना पंचांनी सामना केला रद्द, कारण की...Image Credit source: Sarah Reed/Getty Images
| Updated on: Nov 28, 2025 | 9:22 PM
Share

वुमन्स बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेत एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सिडनी थंडरचा विजय जवळपास पक्का होता. पण नशिबाने विजयाची घास हिरावून घेतला. त्यामुळे या क्रिकेट सामन्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पंचांनी पावसाच्या कारणामुळे हा सामना रद्द केल्याचं सांगितलं. खरं तर 13 चेंडूत 3 धावांची गरज होती आणि हा सामना सहज जिंकता आला असता. पण पंचांच्या निर्णयामुळे सिडनी थंडरच्या पदरी निराशा पडली. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे हा सामना 5-5 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. एडिलेट ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 2 गडी गमवून 45 धावा केल्या. लॉरा वॉल्वार्टने स्ट्रायकर्सकडून खेळताना 13 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यात दोन चौकार आणि एक षटाकर मारला. तर कर्णधार ताहलिया मॅक्ग्राने 6 चेंडूत 12 धावा केल्या.

विजयासाठी दिलेल्या 45 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडरने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षटकात 13 काढल्या. पावसाची रिपरिप सुरु होती. दुसरीकडे, धावांचा वर्षाव सुरु होता. या सामन्यात फोएबे लिचफिल्डने 15 चेंडू नाबाद 38 धावा काढल्या. यात पाच चौकार मारले. तिने डार्सी ब्राऊनच्या एकच षटकात सलग चार चौकार मारले. सिडनी थंडरने तिसऱ्या षटकात बिनबाद 43 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज होती. त्यामुळे विजय पक्का होता. मात्र सामन्यात ट्विस्ट आला आणि रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.

लिचफिल्डने सामना रद्द झाल्यानंतर निराशा व्यक्त केली आणि म्हणाली, “खूप निराशा झाली. हे खूप वाईट आहे.” दरम्यान, स्ट्रायकर्सची कर्णधार ताहलिया मॅकग्रा म्हणाली, “कठीण निर्णय. पाऊस थांबला होता, पण चेंडू निसरडा झाला होता. पंचांनी योग्य निर्णय घेतला.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

एडलेड स्ट्रायकर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, टॅमी ब्यूमोंट, मॅडलिन पेन्ना, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ब्रिजेट पॅटरसन (यष्टीरक्षक), एली जॉन्स्टन, अमांडा-जेड वेलिंग्टन, सोफी एक्लेस्टोन, जेम्मा बार्सबी, तबाथा सॅव्हिल, डार्सी ब्राउन.

सिडनी थंडर महिला (प्लेइगं इलेव्हन): जॉर्जिया वोल, ताहलिया विल्सन (विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड (कर्णधार), हीदर नाइट, चामारी अथापथ्थू, अनिका लिरॉयड, लॉरा हॅरिस, लुसी फिन, तानेल पेशेल, शबनीम इस्माइल, सामंथा बेट्स.

मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.