AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Auction : आयपीएल मिनी लिलावात तीन दिग्गज खेळाडूंवर बंदी, बीसीसीआयची कठोर कारवाई

आयपीएल मिनी लिलावासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात तीन दिग्गज खेळाडूंवर बंदी असल्याने त्यांनाही डावलण्यात आलं आहे.

IPL 2026 Auction : आयपीएल मिनी लिलावात तीन दिग्गज खेळाडूंवर बंदी, बीसीसीआयची कठोर कारवाई
IPL 2026 Auction : आयपीएल मिनी लिलावात तीन दिग्गज खेळाडूंवर बंदी, बीसीसीआयची कठोर कारवाईImage Credit source: PTI
| Updated on: Dec 09, 2025 | 3:56 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजण्याआधीच संघाची बांधणी सुरु आहे. रिटेन केलेल्या खेळाडूंनंतर आता आवश्यक खेळाडूंसाठी बोली लावण्याची वेळ आली आहे. 16 डिसेंबर रोजी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. फ्रेंचायझी आपल्या संघाच्या गरजेनुसार खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आतापर्यंत मिनी लिलावासाठी 1355 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी आता फक्त 350 खेळाडूंवर बोली लागणार असून 1005 खेळाडूंना मिनी लिलावातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बाहेर केलेल्या खेळाडूंमध्ये तीन दिग्गज खेळाडूंचं नावही आहे. खरं त्यांना घेण्यासाठी कोणत्याही फ्रेंचायझीने पायघड्या टाकल्या असत्या. पण बीसीसीआयच्या कठोर नियमाचा त्यांना फटका बसला आहे. हे तिन्ही खेळाडू इंग्लंडचे असून त्यांच्यात सामना पालटण्याची ताकद आहे. पण आता त्यांना या स्पर्धेत खेळता येणार नाही.

आयपीएल 2026 मिनी लिलावात बंदी घातलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक आणि जेसन रॉय यांची नावे आहेत. हॅरी ब्रूक आणि जेसन रॉय यांना मेगा लिलाव 2025 मध्ये भाव मिळाला होता. पण त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे फ्रेंचायझींचं गणित ऐनवेळी बिघडलं होतं. या खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी घेतलं होतं. पण त्याने इंग्लंडच्या स्थानिक हंगामात खेळण्यासाठी लीग सोडली. त्याच्यावर 2026 आणि 2027 मध्ये खेळण्यास बंदी आहे. जेसन रॉय याने 2024 मध्ये वैयक्तिक कारणासाठी आयपीएल सोडले होते. त्याने 2025 च्या आयपीएलमध्ये भाग घेतला नाही. बेन स्टोक्सनेही असंच केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली आहे.

कॅप्ड खेळाडू आणि त्यांचा भाव:

  1. डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड) 2 कोटी रुपये
  2. जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया) 2 कोटी रुपये
  3. कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) 2 कोटी रुपये
  4. सर्फराज खान (भारत) 75 लाख
  5. डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) 2 कोटी रुपये
  6. पृथ्वी शॉ (भारत) 75 लाख
  7. गस अ‍ॅटकिन्सन (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  8. वानिंदू हसरंगा (श्रीलंका) 2 कोटी
  9. दीपक हुडा (भारत) 75 लाख
  10. व्यंकटेश अय्यर (भारत) 2 कोटी
  11. लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  12. विआन मुल्डर (दक्षिण आफ्रिका) 1 कोटी
  13. रचिन रवींद्र (न्यूझीलंड) 2 कोटी
  14. फिन अ‍ॅलन (न्यूझीलंड) 1 कोटी रुपये
  15. जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) 1 कोटी रुपये
  16. केएस भारत (इंडिया) 75 लाख
  17. क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) 1 कोटी रुपये
  18. बेन डकेट (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  19. रहमानउल्ला गुरबाज (अफगाणिस्तान) 1.5 कोटी
  20. जेमी स्मिथ (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  21. गेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका) 2 कोटी
  22. आकाश दीप (भारत) 1 कोटी
  23. जेकब डफी (न्यूझीलंड) 2 कोटी
  24. फजलहक फारुकी (अफगाणिस्तान) 1 कोटी 
  25. मॅट हेन्री (न्यूझीलंड) 1.5 कोटी रुपये
  26. स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) 1.5 कोटी
  27. शिवम मावी (भारत) 75 लाख
  28. ॲनरिक नॉर्टजे (दक्षिण आफ्रिका) रु. 2 कोटी
  29. मथिशा पाथिराना (श्रीलंका) 2 कोटी
  30. रवी बिश्नोई (भारत) 2 कोटी
  31. राहुल चहर (भारत) 1 कोटी
  32. अकिल होसेन (वेस्ट इंडिज) 2 कोटी रुपये
  33. मुजीब रहमान (अफगाणिस्तान) 2 कोटी रु
  34. महेश थेक्षाना (श्रीलंका) 2 कोटी
  35. मयंक अग्रवाल (भारत) 75 लाख
  36. सेदिकुल्लाह अटल (अफगाणिस्तान) 75 लाख
  37. अकीम ऑगस्टे (वेस्ट इंडिज) 75 लाख
  38. रीझा हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) 1 कोटी
  39. पथुम निसांका (श्रीलंका) 75 लाख
  40. टिम रॉबिन्सन (न्यूझीलंड) 75 लाख
  41. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 2 कोटी रुपये
  42. राहुल त्रिपाठी (भारत) 75 लाख
  43. शॉन अ‍ॅबॉट (ऑस्ट्रेलिया) 2 कोटी रुपये
  44. मायकेल ब्रेसवेल (न्यूझीलंड) 2 कोटी रुपये
  45. बेन द्वारशुईस (ऑस्ट्रेलिया) 1 कोटी
  46. जॅक फॉल्क्स (न्यूझीलंड) 75 लाख
  47. जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) 2 कोटी रुपये
  48. डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) 2 कोटी रुपये
  49. डॅनियल सॅम्स (ऑस्ट्रेलिया) 1 कोटी रुपये
  50. दासुन शनाका (श्रीलंका) 75 लाख
  51. मॅथ्यू शॉर्ट (ऑस्ट्रेलिया) 1 कोटी
  52. टॉम बँटन (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  53. जॉर्डन कॉक्स (इंग्लंड) 75 लाख रुपये
  54. शाई होप (वेस्ट इंडिज) 2 कोटी रुपये
  55. जोश इंगलिस (ऑस्ट्रेलिया) 2 कोटी रुपये
  56. बेंजामिन मॅकडर्मॉट (ऑस्ट्रेलिया) 75 लाख रुपये
  57. कुसल मेंडिस (श्रीलंका) 75 लाख
  58. कुसल परेरा (श्रीलंका) 1 कोटी
  59. टिम सेफर्ट (न्यूझीलंड) 1.5 कोटी रुपये
  60. काइल जेमिसन (न्यूझीलंड) 2 कोटी रुपये
  61. साकिब महमूद (इंग्लंड) 1.5 कोटी रुपये
  62. अ‍ॅडम मिल्ने (न्यूझीलंड) 2 कोटी रुपये
  63. लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका) 2 कोटी
  64. विल्यम ओ’रोर्क (न्यूझीलंड) 2 कोटी
  65. मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश) 2 कोटी रु
  66. चेतन साकरीया (भारत) 75 लाख
  67. कुलदीप सेन (भारत) 75  लाख
  68. उमेश यादव (भारत) 1.5 कोटी
  69. कैस अहमद (अफगाणिस्तान) 75 लाख
  70. रिशाद हुसेन (बांगलादेश) 75 लाख
  71. मोहम्मद वकार सलामखिल (अफगाणिस्तान) 1 कोटी
  72. वियास्कांत विजयकांत (श्रीलंका) 75 लाख
  73. रेहान अहमद (इंग्लंड) 75 लाख
  74. कूपर कॉनोली (ऑस्ट्रेलिया) 2 कोटी रुपये
  75. टॉम करन (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  76. बेव्हॉन-जॉन जेकब्स (न्यूझीलंड) 75 लाख रुपये
  77. डॅनियल लॉरेन्स (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  78. जॉर्ज लिंडे (दक्षिण आफ्रिका) 1 कोटी
  79. गुलबदीन नायब (अफगाणिस्तान) 1 कोटी रुपये
  80. विल्यम सदरलँड (ऑस्ट्रेलिया) 1 कोटी
  81. ब्यू वेबस्टर (ऑस्ट्रेलिया) 1.25 कोटी
  82. तस्किन अहमद (बांगलादेश) 75 लाख रुपये
  83. रिचर्ड ग्लीसन (इंग्लंड) 75 लाख
  84. अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज) कोटी रुपये
  85. शमार जोसेफ (वेस्ट इंडिज) 75 लाख रुपये
  86. रिले मेरेडिथ (ऑस्ट्रेलिया) 1.5 कोटी
  87. झाय रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) 1.5 कोटी रुपये
  88. नवदीप सैनी (भारत) 75 लाख
  89. नवीन उल हक (अफगाणिस्तान) 2 कोटी रुपये
  90. ल्यूक वूड (इंग्लंड) 75 लाख रुपये
  91. मुहम्मद अब्बास (न्यूझीलंड) 75 लाख रुपये
  92. चारिथ असलंका (श्रीलंका) 1 कोटी
  93. रोस्टन चेस (वेस्ट इंडिज) 1.2 कोटी रुपये
  94. लियाम डॉसन (इंग्लंड) 2 कोटी रुपये
  95. जॉर्ज गार्टन (इंग्लंड) 75 लाख
  96. काइल मेयर्स (वेस्ट इंडिज) 1.25 कोटी रुपये
  97. ड्वेन प्रिटोरियस (दक्षिण आफ्रिका) रु. 1 कोटी
  98. नाथन स्मिथ (न्यूझीलंड) 75 लाख रुपये
  99. दुनिथ वेलालेज (श्रीलंका) 75 लाख
  100. जेसन बेहरेनडॉर्फ (ऑस्ट्रेलिया) 1.5 कोटी रुपये
  101. तनझिम हसन साकिब (बांगलादेश) 75  लाख
  102. मॅथ्यू पॉट्स (इंग्लंड) 75 लाख रुपये
  103. नाहिद राणा (बांगलादेश) 75 लाख
  104. ऑली स्टोन (इंग्लंड) 1.2 कोटी रुपये
  105. जोशुआ टोंगे (इंग्लंड) 1 कोटी
  106. संदीप वॉरियर (भारत) 75 लाख
  107. वेस्ली अगर (ऑस्ट्रेलिया) 75 लाख
  108. बिनुरा फर्नांडो (श्रीलंका) 75 लाख
  109. मोहम्मद शरीफुल इस्लाम (बांगलादेश) 75 लाख
  110. जोशुआ लिटल (आयर्लंड) 75 लाख
  111. ओबेद मॅकॉय (वेस्ट इंडिज) 75 लाख
  112. बिली स्टॅनलेक (ऑस्ट्रेलिया) 75 लाख

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम