श्रेयस अय्यरला आता या अटीवरच टीम इंडियात मिळणार स्थान, नेमकं काय ते जाणून घ्या

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी 3 जानेवारीला संघ घोषित केला जाईल. पण या संघात श्रेयस अय्यर खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. असं असताना त्याच्यापुढे एक अट ठेवण्यात आली आहे.

श्रेयस अय्यरला आता या अटीवरच टीम इंडियात मिळणार स्थान, नेमकं काय ते जाणून घ्या
श्रेयस अय्यरला आता या अटीवरच टीम इंडियात मिळणार स्थान, नेमकं काय ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 02, 2026 | 5:20 PM

नववर्ष 2026 च्या सुरुवात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून करणार आहे. या मालिकेसाठी 3 जानेवारीला संघाची घोषणा केली जाणार आहे. या मालिकेत खेळण्यासाठी श्रेयस अय्यर पुढे एक अट ठेवण्यात आली आहे. ही अट पूर्ण न केल्यास त्याला टीम इंडियात जागा मिळणार नाही. मिडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमधून रिटर्न टू प्लेच्या मंजुरीसाठी दोन मॅच सिम्युलेशन सेशन्स पास करावे लागतील.श्रेयस अय्यरने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चार सेशन पास केले आहेत. पण त्याची सध्याची फिटनेस पाहता आणखी दोन सामन्यांचं सिम्युलेशन सत्र आयोजित केलं जाणार आहे. 2 जानेवारी आणि 5 जानेवारीला हे सत्र असेल. त्यामुळे श्रेयस अय्यरचं संघात खेळणं कठीण आहे. श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन आधीच होणार होतं. पण त्याच्या रिकव्हरी काम करणाऱ्या वैद्यकीय टीमने त्याचे मसल मास कमी झाल्याचं निरीक्षण केलं. त्यामुळे त्याला आणखी एका टेस्ट गरज आहे.

विजय हजारे ट्रॉफीत श्रेयस अय्यर मुंबईकडून दोन सामने खेळणार होता. पण तसं होताना दिसत नाही. आता बीसीसीआयची निवड समिती 3 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या संघात स्थान मिळवणं श्रेयस अय्यरला कठीण दिसत आहे. पण पहिल्या सामन्यातील सिम्युलेशन सत्र पाहिल्यानंतर बीसीसीआय निर्णय घेऊ शकते. पण हे सर्व काही जर तरवर अवलंबून आहे. श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत निवड झाली तर ऋतुराज गायकवाडला फटका बसू शकतो. कारण अय्यरच्याा गैरहजेरीत ऋतुराज गायकवाडने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तसेच शतकही ठोकलं होतं. दुसरीकडे, कर्नाटकचा देवदत्त पडिक्कलही टीम इंडियाच्या वेशीवर उभा आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या चार सामन्यात तीन शतकं ठोकली आहेत.

श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत गंभीर दुखापत झाली होती. झेल पकडताना डाइव्ह मारणं त्याला चांगलंच महागात पडलं होतं. त्याच्या स्प्लीनमध्ये दुखापत झाली आणि आतच रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर दोन महिने मैदानापासून दूर राहीला. या दरम्यान त्याचं सहा किलो वजन कमी झालं आहे. त्याला आपलं वजन नियंत्रण आणण्यासाठी दुखापतीतून पूर्णपणे सावरणं गरजेचं आहे.