AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U 19 Asia Cup 2024 : सोमवारी टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना, जाणून घ्या

U 19 Asia Cup 2024 : टीम इंडियाला अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता टीम इंडिया 2 डिसेंबरला विजयाच्या निश्चयाने मैदानात उतरणार आहे. जाणून घ्या.

U 19 Asia Cup 2024 : सोमवारी टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना, जाणून घ्या
u 19 asia cup team india huddle talkImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 01, 2024 | 11:42 PM
Share

अंडर आशिया 19 आशिया कप 2024 स्पर्धेला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 15 सामने होणार आहेत. टीम इंडियाची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. भारताला 30 नोव्हेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. आता त्यानंतर 2 डिसेंबर रोजी हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. मात्र हे दोघे एकमेकांविरुद्ध खेळणार नाहीत. या दोन्ही संघांचा प्रतिस्पर्धी वेगळा आहे. या दोन्ही संघांचा प्रतिस्पर्धी कोण आहे? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार हे आपण जाणून घेऊयात.

सोमवारी 2 सामने

सोमवारी 2 डिसेंबर रोजी ए ग्रुपमधील इंडिया, पाकिस्तान, जपान आणि यूएई सामना खेळणार आहेत. स्पर्धेतील आठव्या सामन्यात इंडिया विरुद्ध जपान दोन हात करणार आहेत. तर सातव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध यूएई आमनेसामने असणार आहेत. चारही संघांचा हा दुसरा सामना असणार आहे. दोन्ही सामन्यांना सकाळी भारतीय वेळेनुसार 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध जपान यांच्यातील सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियमध्ये करण्यात आलं आहे. तर पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हे सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.

पाकिस्तान आणि यूएईने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानने भारताला तर यूएईने जपानला पराभूत केलंय. त्यामुळे आता सोमवारी कोणता संघ विजयी होतो कुणाचा पराभव? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, किरण चोरमले (वीसी), प्रणव पंत, हरवंश सिंह पंगालिया (विकेटकीपर), अनुराग कावडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद एनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजीत गुहा, चेतन शर्मा आणि निखिल कुमार.

जपान: कोजी हार्डग्रेव-अबे (कॅप्टन), चार्ल्स हिंज, काज़ुमा काटो-स्टैफोर्ड, ह्यूगो केली, टिमोथी मूर, स्काइलर नाकायमा-कुक, डैनियल पैनकहर्स्ट, निहार परमार, आदित्य फडके, आरव तिवारी, काई वॉल, युतो यागेटा, किफर यामामोटो-लेक आणि मॅक्स योनेकावा-लिन.

पाकिस्तान: साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद अहमद, हारून अरशद, तैयब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नवीद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रजा, मोहम्मद रियाजुल्लाह, अब्दुल सुभान, फरहान यूसुफ आणि उमर जैब.

यूएई: अयान खान (कॅप्टन), अक्षत राय, आर्यन सक्सेना, अब्दुल्ला तारिक, अलियासगर शम्स, एथन डिसूजा, फसीउर रहमान, हर्ष देसाई, करण धीमान, मुदित अग्रवाल, नूरुल्लाह अयौबी, रचित घोष, रेयान खान, उदीश सूरी आणि यायिन किरण.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.