PAK vs NEP : पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस, टीम इंडियानंतर नेपाळने लोळवलं, 6 विकेट्सने धुव्वा

Pakistan vs Nepal U 19 Women Asia Cup 2024 : नवख्या नेपाळ वूमन्स क्रिकेट टीमने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलं. नेपाळचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला.

PAK vs NEP : पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस, टीम इंडियानंतर नेपाळने लोळवलं, 6 विकेट्सने धुव्वा
u 19 women asia cup 2024 nepal beat pakistan
Image Credit source: @TheRealPCB_Live x account
| Updated on: Dec 17, 2024 | 12:35 AM

अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा मलेशियाकडे आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, यजमान मलेशिया आणि बांगलादेशचा समावेश आहे. पाकिस्तानला या स्पर्धेत सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडियानंतर पाकिस्तानला नेपाळने लोळवलं आहे. नेपाळने हा सामना 6 विकेट्सने जिंकला आणि पहिला विजय मिळवला.

सामन्यात काय झालं?

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामन्यांचं आयोजन हे मलेशिया येथील क्वालालंपूरमधील बायुमास क्रिकेट ओव्हल स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र कॅप्टन जोफिशन अय्याज हीचा निर्णय पाकिस्तान टीममधील फलंदाजांना योग्य ठरवता आलं नाही. पाकिस्तानने 20 ओव्हर खेळून काढल्या. मात्र त्यांच्याकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स मगावून 104 धावा केल्या. पाकिस्तानसाठी कोमल खान हीने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर महम अनीस हीने नाबाद 29 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 100 पार मजल मारता आली. नेपाळकडून कॅप्टन पुजा महतो हीने सर्वाधिक2 विकेट्स घेतल्या. तर रचना कुमारी, रिया शर्मा आणि सीमाना केसी या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

त्यानंतर 105 धावांचा पाठलाग करायला आलेल्या नेपाळने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. कॅप्टन पूजा महातो सीमाना केसी या जोडीने नेपाळला विजयी केलं. पूजाने नाबाद 47 धावांची विजयी खेळी केली. तर सीमाना केसी हीने नॉट आऊट 12 रन्स जोडल्या. त्याआधी सना प्रवीण हीने 10 साबित्री धामीने 8 आमि सोनी पाखरीनने 13 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून फातिमा खान आणि कुरतुलैन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

नेपाळकडून पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा

नेपाळ वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : पूजा महातो (कॅप्टन), सना प्रवीण, साबित्री धामी, सोनी पाखरीन, ज्योत्स्निका मरासिनी, सीमाना केसी, अनु कदायत, क्रीश्मा गुरुंग, अलिशा कुमारी यादव, रिया शर्मा आणि रचना कुमारी.

पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : जोफिशन अय्याज (कॅप्टन), कोमल खान, रवेल फरहान, अरीशा अन्सारी, महम अनीस, फातिमा खान, अलीसा मुख्तियार, कुरतुलैन, महनूर जेब आणि शाहर बानो.