
वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आणि नववर्षाची सुरुवात विजयाने केली. भारताने यूथ वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर डीएलसनुसार 25 धावांनी मात केली. भारताने यासह 3 सामन्यांच्या मलिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसर्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा करो या मरो असा सामना आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
उभयसंघातील दुसरा सामना हा सोमवारी 5 जानेवारीला विलोमूर पार्क बेनोनी इथे होणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता नाणेफेकीचा कौल लागणार आहे. भारतीय संघाचा हा सामना जिंकून मालिका नावावर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच विजयी सुरुवात केल्याने भारताला तिसऱ्या सामन्यातही मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरावं लागणार आहे.
उभयसंघातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण झाला नाही. सामन्याचा निकाल हा डीएसनुसार लावण्यात आला.भारताने या सामन्यात 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 301 रन्स केल्या. प्रत्त्युतरात दक्षिण आफ्रिकेने 27.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 148 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सामना बरोबरीत सुरु होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झालाच नाही. भारताने अशाप्रकारे हा सामना डीएलनुसार 25 धावांनी जिंकला. पावसामुळे दक्षिण आफ्रिलेला सामना जिंकण्यासाठी पूर्ण संधी मिळालीच नाही
दरम्यान दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. नियमित कर्णधार आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याला नेतृत्वाची धुरा देण्यात आलीय. भारताने वैभवच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. मात्र वैभवला कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. त्यामुळे वैभव दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करुन भारताला विजयासह मालिका जिंकून द्यावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.