Team India | टीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द

Indian Cricket Team | टीम इंडियाचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळ भारतीय क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. सामन्यात फलंदाजांऐवजी पावसानेच टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली.

Team India | टीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 11, 2024 | 4:11 PM

जोहान्सबर्ग | टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामना हा रद्द झाला आहे. पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 ट्राय सीरिजचं आयोजन करण्यात आलं होतं. या ट्राय सीरिजमध्ये टीम इंडिया, अफगाणिस्तान आणि यजमान दक्षिण आफ्रिका अशा 3 संघांचा समावेश होता. टीम इंडिया या मालिकेतील पाचवा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत पोहचली. तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं.

त्यानंतर 10 जानेवारी रोजी टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार होता. मात्र पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सामना होऊ शकला नाही. परिणामी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आलं. बीसीसीआयने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संयुक्त विजेते

अंडर 19 टीम इंडिया | उदय सहारण (कर्णधार), इनेश महाजन (विकेटकीपर), रुद्र पटेल, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश, सचिन धस, मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, आराध्या शुक्ला, सौम्य पांडे, प्रेम देवकर, मोहम्मद अमान, अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, धनुष गौडा आणि अंश गोसाई.

अंडर 19 दक्षिण आफ्रिका टीम | डेव्हिड टीगर (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराइस, ऑलिव्हर व्हाईटहेड, रिले नॉर्टन, न्कोबानी मोकोएना, जुआन जेम्स, क्वेना माफाका, सिफो पोट्साने, मोंडली खुमालो, रोमाशान पिल्ले, मार्टिनम खमालो, एसोसा एहीबा, एन्तांडो झुमा आणि एन्तांडो सोनी.