U19 WC Final, IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार वर्ल्ड कप?

Icc U19 World Cup Final 2026 India vs England Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना कधी आणि कुठे खेळवण्यात येणार? जाणून घ्या

U19 WC Final, IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार वर्ल्ड कप?
U19 World Cup 2026 Final India vs England
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 06, 2026 | 2:30 AM

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार शुक्रवारी 6 फेब्रुवारीला रंगणार आहे. या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांना आतापर्यंत साखळी आणि बाद फेरीत प्रतिस्पर्धी संघ पराभूत करण्यात अपयशी ठरलेत. अशात आता कोणता संघ आणखी एक विजय मिळवून या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी 6 फेब्रुवारीला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथे आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना मोबाईल/टीव्ही/लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

भारत-इंग्लंड वर्ल्ड कप फायनलसाठी सज्ज

दोन्ही संघांचा इथवरचा प्रवास

दरम्यान इंग्लंडने साखळी फेरीतील पाचही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला लोळवलं. तसेच उपांत्य फेरीत गतविजेता ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून फायनलमध्ये धडक दिली. तर टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करुन फायनलचं तिकीट मिळवलं. भारताची अंतिम फेरीत पोहचण्याची सलग सहावी तर एकूण दहावी वेळ ठरली. आता टीम इंडिया इंग्लंडला लोळवून वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.