
अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला. बांगलादेशने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाणेफेकीवेळी एक वेगळंच दृश्य प्रेक्षकांना पाहता आलं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसवेळी हँडशेक करणं टाळलं. त्यामुळे दोन्ही देशातील वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे. नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा उपकर्णधार जवाद अबरार मैदानात आले होते. पण दोघांनही एकमेकांकडे ढुंकूनही पाहलं नाही. इतकंच तर एकमेकांपासून लांब राहणं पसंत केलं. त्यामुळे दोन्ही देशांमधील वाढत्या राजनैतिक आणि क्रिकेट तणावाचे दर्शन घडले. हा क्षण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आणि चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच काय तर बांगलादेशचा उपकर्णधार नियमित कर्णधार अझीमुला हकीऐवजी नाणेफेकीला आला. हकीम प्लेइंग 11 मध्ये असूनही असा निर्णय घेतला गेला.
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जवाद अबरार म्हणाला की, ‘आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. खेळपट्टी ओली दिसत आहे आणि आम्हाला पहिल्या 10-15 षटकांचा फायदा घ्यायचा आहे. आम्ही चांगली तयारी केली आहे, आशिया कपमध्येही आम्ही चांगली कामगिरी केली. आज आमच्याकडे दोन अष्टपैलू खेळाडू खेळत आहेत.’ आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमानला काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा संताप झाला आहे. बांगलादेशने आता भारतात टी20 वर्ल्डकप खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Toss news 🗞️#TeamIndia will bat first in their second group game 🆚 Bangladesh!️#ICCMensU19WC | #INDvBAN 👉 LIVE NOW ➡️ https://t.co/DGP23ftABG pic.twitter.com/5hZ9PFHbFL
— Star Sports (@StarSportsIndia) January 17, 2026
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. आयुष म्हात्रे, वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा स्वस्तात बाद झाले. तर वैभव सूर्यवंशी एका बाजूने किल्ला लढवला. त्याने 67 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार मारत 72 धावा केल्या.
भारताने आशिया कप 2025 स्पर्धेपासून नो हँडशेक पॉलिसी अवलंबली आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कुरापतींनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडून टाकले आहेत. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारताने नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. आता पाकिस्तानसारखंच बांगलादेशसोबत घडत असल्याचं बोललं जात आहे. बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात संतापाची तीव्र लाट आहे. भारताने वारंवार बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा निषेध केला आहे.