U19 World Cup 2026: पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतातून आऊट? कसं काय ते समजून घ्या

Pakistan U19 vs India U19: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीची चुरस वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण या सामन्यात विजय मिळाला तरी पाकिस्तानचं उपांत्य फेरी गाठणं कठीण आहे.

U19 World Cup 2026: पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतातून आऊट? कसं काय ते समजून घ्या
U19 World Cup 2026: पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतातून आऊट? कसं काय ते समजून घ्या
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jan 28, 2026 | 5:18 PM

Pakistan Scenario for U19 World Cup Semifinal: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. सुपर सिक्स फेरीचे सामने सुरू असून ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील टॉप 2 संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. ग्रुप 2 मधून भारत, इंग्लंड आणि पाकिस्तान हे तीन संघ शर्यतीत आहेत. पण पाकिस्तान उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता खूपच कमी आहे. एखादा चमत्कार घडला तरच उपांत्य फेरीचं गणित सुटू शकतं. भारत पाकिस्तान सामना 1 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भारत पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. पण सध्याचं समीकरण पाहता उपांत्य फेरीचं गणित भारत आणि इंग्लंडच्या बाजूने आहे. भारत आणि इंग्लंडचे उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता अधिक आहे. कारण ग्रुप 2 मधील गुणतालिका पाहिल्यानंतर हे समीकरण लक्षात येते.

सुपर सिक्स फेरीत एन्ट्री घेतली तेव्हा भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर होता. तर इंग्लंडने पहिलं स्थान गाठलं होतं. पण भारताने सुपर सिक्स फेरीच्या पहिल्याच सामन्या झिम्बाब्वेला धोबीपछाड दिला. भारताने 200 हून अधिक धावांनी झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे इंग्लंडपेक्षा नेट रनरेट अधिक चांगला झाला. त्यामुळे समान गुण असले तरी बारताने पहिलं स्थान गाठलं आहे. तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने ग्रुप 2 मधील एका विजयासह 2 गुणांची कमाई केली आहे. तसेच आधीच्या गुणांचा गोळाबेरीज करून 6 गुण पारड्यात पडले आहेत. तसेच नेट रनरेट हा 3.337 इतका आहे. इंग्लंडच्या पारड्यातही 6 गुण आहेत. पण त्यांचा नेट रनरेट ह 1.989 आहे.

पाकिस्तानचं गणित मात्र किचकट आहे. कारण साखळी फेरीत 3 सामन्यापैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाल्याने 4 गुण आहेत. तसेच नेट रनरेट हा 1.484 इतका आहे. भारत आणि इंग्लंडच्या तुलनेत दोन गुण कमी आहेत. तसेच नेट रनरेटही कमी आहे. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना जिंकला तरी नेट रनरेटचं गणित सोडवणं खूपच कठीण आहे. इंग्लंडचा सुपर सिक्समधील शेवटचा सामना न्यूझीलंडशी आहे. हा सामना 30 जानेवारीला होणार आहे. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर पाकिस्तानचा एक पर्याय संपून जाईल. पाकिस्तानला भारताविरूद्धच्या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल.

भारताविरुद्ध असा विजय मिळवावा लागेल

  • भारताने प्रथम फलंदाजी केली आणि 250 धावा केल्या तर पाकिस्तानला 25 किंवा कमी षटकात हे आव्हान गाठावं लागेल. भारताने 300 धावांचं टार्गेट दिलं तर 22 षटकं शिल्लक ठेवून हे लक्ष्य गाठावं लागेल. 350 धावांचं आव्हान असेल तर 19 षटकं शिल्लक ठेवून विजयी धावा गाठाव्या लागतील.
  • पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि 250 धावा केल्या तर 118 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी जिंकावं लागेल. 300 धावा केल्या तर कमीत कमी 96 धावांनी, तर 350 धावा केल्या 72 किंवा त्यापेक्षा जास्त धावांना सामना जिंकावा लागेल.